नवी दिल्ली : लडाखच्या गलवान खोऱ्यात भारत-चीन सैनिकांत (India-China Border Dispute) जोरदार हिंसक झडप झाली. यात भारताचे जवळपास २० सैनिक शहीद झालेत. तर चीनलाही एवढेच मोठे नुकसान झाले आहे. भारताचे जे सैनिक शहीद झाले आहेत, त्यात कर्नल रँकच्या अधिकाऱ्याचा समावेश आहे. चीनचे तेवढेच सैनिक मारले गेले आहेत. यात कमांडिंग ऑफिरसचा समावेश आहे.
दरम्यान, रात्री गलवान खोऱ्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा हिंसक झडप झाली. त्यावेळी एक नवीन घटना समोर आली आहे. यावेळी काही सैनिक नदी तसेच दरीत कोसळून शहीद झालेत. चीनी सैन्य पूर्ण तयारीत आले होते. त्यांच्यासोबत लोखंडाचे रॉड आणि काही तोडलेल्या काटेरी तारा होत्या, अशी माहिती मिळत आहे.
एएनआयच्या मते, चीनकडून ४३ लोक गंभीर जखमी झाले आहेत. दुर्घटनेत मृतांची संख्या आणि गंभीर जखमींचा समावेश आहे. एएनआयनेही उच्च-सूत्रांच्या माहितीनुसार, चीनकडून होणाऱ्या जखमींच्या संख्येत वाढ होऊ शकते असे म्हटले आहे. दरम्यान, भारत-चीन तणावाच्यावेळी नेमके किती वाजता काय झालं?
१५ -१६ जून रात्री - लडाखमधील एलएसी येथे भारत-चीन सैन्यांमध्ये झडप झाली
१६ जून , १ : ०० वाजता - अधिकाऱ्यासह तीन भारतीय सैनिक शहीद
१६ जून, १: ४५ वाजता - संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री, सीडीएस, तीन सैन्य प्रमुखांची बैठक
१६ जून, २ : ०० वाजता - चीन वादावर तोडगा काढण्यासाठी बैठक
१६ जून, २ : ११ वाजता - एलएसी येथे भारत-चीन कमांडर-स्तरीय चर्चा
१६ जून, ३ : ०० वाजता - संरक्षणमंत्र्यांनी पंतप्रधान मोदींना घटनेची माहिती दिली
१६ जून, ३: १४ वाजता - ग्लोबल टाइम्सने स्पष्ट केले की, चकमकीत चीनचे सैनिक मारले गेले
१६ जून, ३.२३ वाजता : चीनकडून विधान, भारताने दोन वेळा सीमा रेषेचे उल्लंघन
१६ जून, ५ . २८ संध्याकाळी : लष्कर प्रमुखांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली
१६ जून, ५ . ५१ संध्याकाळी : सीडीएसने संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली
१६ जून, ५ . ५७ वाजता - परराष्ट्रमंत्री एस जयशंकर संरक्षणमंत्र्यांना भेटण्यासाठी पोहोचले
१६ जून, ६ . २५ वाजता - संरक्षणमंत्री, परराष्ट्रमंत्री, सीडीएस, लष्करप्रमुखांची बैठक संपली
१६ जून, ७ . ०१ रात्री परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली
१६ जून, ७.५९ वाजता - भारतीय सीमेत नेहमीच भारतीय कृती - परराष्ट्र व्यवहार मंत्रालय
१६ जून, ८.०८ वाजता रात्री - बीजिंगमध्ये भारतीय राजदूत आणि चिनी उपपरराष्ट्रमंत्री यांची बैठक
१६ जून, ८.३८ वाजता रात्री - पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी सीसीएसची बैठक
१६ जून, ९.०० वाजता रात्र - हिंसक झडपेत २०भारतीय सैनिक शहीद
१६ जून, ९.३८ वाजता रात्री - ४३ चीनी सैनिक मारले गेल्याचे आणि जखमी झाल्याची वृत्त
१६ जून, १०.१५ वाजता रात्री - चीन सीमेवरील किन्नौर आणि लाहौल येथील परिस्थितीवर अलर्ट जारी
१६ जून, १०.१८ वाजता रात्री - चीनी हेलिकॉप्टरने गलवान खोऱ्यातून मृतदेह नेताना दिसून आले
१६ जून, १०.२४ वाजता रात्री - सीसीएसची बैठक संपली, पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्यात महत्वपूर्ण चर्चा
१७ जून, १.०८ वाजता रात्री - संयुक्त राष्ट्रांनी दोन्ही देशांना जास्तीत जास्त संयम राखण्याचे आवाहन केले
१७ जून, १.०८ वाजता रात्री - अमेरिकेचे विधान, आम्ही या घटनेवर लक्ष ठेवून आहे.