JOBसाठी रिजेक्ट होताच महिलेची भन्नाट आयडिया...लगेचच महिलेला आला एचआरचा कॉल...

एखाद्या कंपनीने तुम्हाला रिजेक्ट केलं असेल तर तुम्ही अशावेळी काय करता?

Updated: Jul 24, 2022, 02:07 PM IST
JOBसाठी रिजेक्ट होताच महिलेची भन्नाट आयडिया...लगेचच महिलेला आला एचआरचा कॉल... title=

Trending News: तुम्ही जॉबच्या शोधात आहात आणि एखाद्या कंपनीने तुम्हाला रिजेक्ट केलं असेल तर तुम्ही अशावेळी काय करता? साधारण आपण त्या कंपनीकडे पुन्हा कधीच आयुष्यात वळून बघत नाही. पण काही लोकं असे पण असतात जे त्याच कंपनीत दुसऱ्या संधीची वाट पाहत असतात. मग अशावेळी पहिल्या वेळी राहिलेली कमी पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतात. एका महिलेला कंपनीने रिजेक्ट केलं त्यानंतर तिने जे काही केलं त्यानंतर तिला लगेचच एचआरचा कॉल आला. सध्या सोशल मीडियावर या महिलेची चर्चा आहे. 

महिलेची भन्नाट आयडिया

अमेरिकेतील एका कंपनीने महिलेला 14 जुलैला रिजेक्शनचा ई-मेल पाठवला होता. त्यानंतर महिलेने विचार केला की रिजेक्ट केलेल्या व्यक्तीचा मेल कोण पाहतं. मग तिने या ई-मेलला रिप्लाय दिला आणि तिने वाय थो मेम पाठवला. या भन्नाट ई-मेलनंतर महिलेला कंपनीकडून पुन्हा इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात आलं. महिलेचा हा ई-मेल सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.  

@swedishswan नावाच्या एका टिकटॉक हँडलवरून या ईमेलची स्टोरी शेअर करण्यात आली आहे. या स्टोरीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. ही महिला व्हर्जिनियामध्ये राहते. या महिलेने शेड्यूलिंग कोऑर्डिनेटरसाठी या कंपनीकडे अर्ज केला होता. पण या कंपनीने अर्जावर रिजेक्शनचा ईमेल पाठवला. 

या महिलेच्या भन्नाट आयडियामुळे ती खूप प्रसिद्ध झाली. या महिलेची वृत्तवाहिन्यांवर मुलाखात सुद्धा झाली. त्यावेळी ती म्हणाली की, ''इंटरव्ह्यू घेणाऱ्यांना कदाचित अशा प्रकारचे मीम पाठवणाऱ्या व्यक्तीला भेटावेसे वाटेले असेल. म्हणून त्यांनी मला बोलावून घेतलं. नोकरी न मिळाल्याने मी निराश झाले होते, पण माझ्या या आयडियाने मला प्रसिद्ध केले. त्यामुळे आता नोकरी न मिळूनसुद्धा मी खूप आनंदी आहे.