नवी दिल्ली : कोरोना विषाणू सर्वात आधी चीनमध्ये सापडला त्याचा तपास करण्यासाठी WHO ची टीम चीनच्या वुहानमध्ये दाखल होते आहे. त्याआधीच चीनने वुहानसह काही शहरांत पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर केला आहे. नागरिकांना घरातच राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. सध्या नव्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय. त्याच पार्श्वभूमीवर चीनमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चीनने अनेक शहरांत लॉकडाऊन जाहीर केल्याचं म्हटलं जातं आहे.
दरम्यान WHO ची टीम तपासासाठी चीनचा दौरा करतेय. मात्र त्यांना 14 दिवस क्वारंटाईन करण्याच्या विचारात चीन आहे. त्यामुळे WHO टीमच्या तपासातन चीन व्यत्यत तर आणत नाहीए ना अशी शंका व्यक्त होते आहे.
कोरोना विषाणूचं थैमान अमेरिकेत अजूनही संपलेलं नाही. अमेरिकेत गेल्या 24 तासांमध्ये कोरोनामुळे सुमारे 4500 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे अमेरिका हा जगातील सर्वाधिक प्रभावित देश ठरला आहे. अमेरिकेत आतापर्यंत 2 कोटी 28 लाख 36 हजार 244 रुग्णांची नोंद झाली आहे, तर 3 लाख 80 हजार 651 लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. यामुळे येथील चार शहरांमध्ये लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. गेल्या 24 तासात कोरोनाचे अनेक रुग्ण आढळले आहेत.
रशियामध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 22,934 नवीन प्रकरणांची वाढ झाली आहे. देशातील एकूण रुग्णांची संख्या वाढून 34,48,203 झाली आहे. तर कोरोनामुळे 531 लोकांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे मृतांची संख्या 62,804 वर गेली.
ब्राझीलने गेल्या 24 तासांत कोरोनामुळे 1,110 लोकांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत एकूण 2,04,690 लोकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत देशात 2,98,172 रुग्णांची नोंद झाली आहे.
जपानमध्ये कोरोनाचे 4,539 रुग्ण वाढले आहेत. जगभरात कोरोनाचे सुमारे 9.1 कोटी रुग्णांची नोंद झाली आहे. तर 19 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.