नाबाद १००: साठाव्या वर्षी झाला कॅन्सर; पण, मृत्यूवरही केली मात

 बदलत्या जीवनशैलिचा विचार करता तर, अनेक जण साठाव्या वर्षीच वैकुंटाचा रस्ता धरतात. पण....

Annaso Chavare अण्णासाहेब चवरे | Updated: Feb 13, 2018, 04:34 PM IST
नाबाद १००: साठाव्या वर्षी झाला कॅन्सर; पण, मृत्यूवरही केली मात title=

मुंबई : युद्ध सुरू झाले की, लढण्यापूर्वीच लढण्यापूर्वीच तलवार टाकणारे कमी नसतात. अशा लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमी असते. पण, काही लोक मात्र स्वभावत:च जिद्दी असतात. संघर्षाला ते घाबरत नाहीत. संकटे किती येवोत. ही कहाणही अशीच आहे. वयाची नाबाद १०० गाठलेल्या एका जिद्दी तरूणाची.

अनेक जण साठाव्या वर्षीच वैकुंटाचा रस्ता धरतात. पण..

खरे तर, ६०वं वर्ष म्हणजे कोणत्याही क्षेत्रातून आपली आणि खरे तर सर्वच जबाबदाऱ्यातून मोकळे होत निवृत्ती घेण्याचे. अलिकडील बदलत्या जीवनशैलिचा विचार करता तर, अनेक जण साठाव्या वर्षीच वैकुंटाचा रस्ता धरतात. पण, आम्ही कहाणी सांगतोय ते गृहस्थ मात्र सर्वांपेक्षा निराळे. या गृहस्थांना वयाच्या ६०व्या वर्षी कर्करोग (कॅन्सर) झाला. पण ते डगमगले नाहीत. उलट अधिक आत्मविश्वासाने जीवन संघर्षाला सामोरे गेले. कर्करोगाच्या निमित्ताने चालून आलेल्या मृत्यूचेही ते बाप ठरले आणि त्यांनी वयाची शंभरीही सहज पार केली.

कहाणी आहे यूएसमधील स्टेमॅटीस मोराईटीस या गृहस्थांची. या गृहस्थाला वयाच्या साठाव्या वर्षी फुप्फुसाचा कार्करोग झाला. डॉक्टरांनी तपासण्या केल्या. उपचारानंतर काही हाताला लागेल याबाबत बरीच साशंकता व्यक्त केली. इतकेच नव्हे डॉक्टर महोदयांनी आपण केवळ ६ ते ७ महिन्यांचेच सोबती असल्याचेही सांगितले. पण, मोराईटीस भलतेच आशावादी. त्यांनी कर्करोगाशी दोन हात करण्याचे ठरवले.

मोराईटीस यांची दिनचर्या

मोराईटीस महोदय इतके सकारात्मक विचारांचे की, त्यांनी दुर्दमय् इच्छाशक्तीच्या जोरावर वयाची चक्क १०२ वर्षे पूर्ण केली. मोराईटीस सांगतात शेती हा माझा आवडता छंद. मी दिवसभर शेतात काम करायचो. दिवसभरातील पूर्ण वेळ हा स्वच्छ आणि मोकळ्या हवेत घालवायचो. मी उन्हंही खूप वेळ अंगावर घ्याययचो. त्याचा परिणाम असा झाला की, त्यांच्या शरीरात विशष बदल घडून आल्याचे जाणवले. मोराईटीस सकाळपासून संध्याकाळपर्यंत केवळ फळेच खात. त्यांनी आपल्या आजाराचा कधीच ताण घेतला नाही. ते सदैव आनंद असत