खाणीतील कामगार रात्रीत झाला कोट्यावधी, दोन महिन्यांत शोधला तिसरा दुर्मिळ रत्न

आयुष्यात नशिबाची चावी कधी कोणत्या दिशेने फिरेल सांगता येत नाही.   

Updated: Aug 5, 2020, 10:04 AM IST
खाणीतील कामगार रात्रीत झाला कोट्यावधी, दोन महिन्यांत शोधला तिसरा दुर्मिळ रत्न  title=

नवी दिल्ली : नाशिबाचं आपलं वेगळचं गणित असतं. आयुष्यात नशिबाची चावी कधी कोणत्या दिशेने फिरेल सांगता येत नाही. असंच काही घडून आलं आहे टानझनियामधील खाणीत काम करणाऱ्या कामगारासोबत. कोविड-१९ या महामारीच्या काळात या कामगाराला खाणीत काम करत असताना अमुल्य रत्ने सापडली आहेत.  Saniniu Laizer असं त्या कामगाराचं नाव आहे. 

२४ जून २०२० रोजी खाणीत काम करत असताना त्याला हे रत्न सापडले आहेत. यामधील एका रत्नांचं वजन साधारण ९.२७ किलो आहे तर दुसऱ्या रत्नाचं वजन ५.१०३ किलो आहे. दोन्ही मौल्यवान रत्ने, जांभळ्या व निळ्या रंगाचे आहेत. 

या दोन्ही रत्नांच्या बदल्यात तेथील सरकारने त्या कामगारास जवळपास २५ कोटी ३६ लाख रूपये दिले आहेत. सध्या दोन्ही मौल्यवान रत्ने टानझनियामधील एका बँकेत ठेवण्यात आले आहेत.  अश्चर्याची गोष्टी दोन रत्न सापडून दोन महिने देखील पूर्ण झाले नाहीत, तर दुसरीकडे Saniniu Laizer तिसऱ्या रत्नाचा शोध लागला. 

या रत्नाचे वजन ६.३ किलो आहे. खाणीत काम करणाऱ्या मजुराचा हा तिसरा मोठा शोध आहे. पूर्वीच्या दोन रत्नांप्रमाणे हे रत्नदेखील खूप मौल्यवान आहे. त्यामुळे येथील सरकार पुन्हा कामगारास सन्मानित करणार आहे.