Miss universe 2021 : भारताची हरनाझ संधूच्या डोक्यावर विश्वसुंदरीचा मुकूट

देशासाठी अभिमानाचा क्षण  

Updated: Dec 13, 2021, 09:32 AM IST
Miss universe 2021 : भारताची हरनाझ संधूच्या डोक्यावर विश्वसुंदरीचा मुकूट  title=

मुंबई : देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. भारताची हरनझ कौर संधूच्या डोक्यावर  Miss Universe 2021चा मुकूट ठेवण्यात आला. भारताने तब्बल 21 वर्षांनंतर मिस युनिव्हर्सचा किताब पटकावला आहे. यापूर्वी 2000 मध्ये लारा दत्ता मिस युनिव्हर्स बनली होती. संपूर्ण भारतीयांसाठी हा गर्वाचा क्षण आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Harnaaz Kaur Sandhu (@harnaazsandhu_03)

कोण आहे हरनाझ संधू?
हरनाझ संधू चंदीगडची राहणारी असून ती मॉडेल आहे. हरनाझने पंजाबी सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. हरनाझ ‘यारा दियां पू बारां’ आणि ‘बाई जी कुट्टांगे’ या पंजाबी सिनेमांमध्ये झळकली आहे. 

तिने अनेक सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेत विजय मिळवला आहे. त्याशिवाय ती अभ्यासातही हुशार आहे. तिचे पदवी शिक्षण पूर्ण झाले असून सध्या ती सध्या पदव्यूतर शिक्षण पूर् करत आहे. तिला घोडेस्वारी आणि पोहण्याची आवड आहे.