मॉडेल ते उद्योजक, ३ मुलांची आई इवांका यांचा यशस्वी प्रवास

इवांका ट्रम्प यांचा प्रवास... 

Updated: Feb 25, 2020, 11:37 AM IST
मॉडेल ते उद्योजक, ३ मुलांची आई इवांका यांचा यशस्वी प्रवास title=

नई दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदा भारत दौऱ्यावर आले आहेत. भारत दौऱ्यावर ट्रम्प यांच्यासोबत त्यांची मुलगी इवांका ट्रम्प या देखील आल्या आहेत. दोन वर्षाआधी त्या भारत दौऱ्यावर आल्या होत्या. बोर्डिंग शाळेत त्या शिकल्या आहेत. त्यानंतर मॉडलिंग, टीवी इंडस्ट्री, सोशल सर्विस आणि त्यानंतर एक उद्योजक म्हणून देखील त्यांनी आपली ओळख बनवली आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका यांचं आधीचं नाव इवाना होतं. त्यांच्या आईच्या नावावर ते ठेवण्यात आलं होतं. नंतर त्यांचं नाव इवांका असं ठेवण्यात आलं. इवांका या डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या पत्नीची मुलगी आहे. इवांका यांचा जन्म 30 ऑक्टोबर 1981 रोजी न्यूयॉर्क मध्ये झाला.

डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका रियालिटी शोमध्ये जज देखील राहिल्या आहेत. टीव्ही ड्रामा सीरीजमध्ये त्या दिसल्या होत्या. त्यानंतर उद्योग क्षेत्रात त्यांनी पाऊल ठेवलं. इवांका यांनी व्हार्टन यूनिवर्सिटीमधून अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे.

इवांका 2017 मध्ये ही भारतात आल्या होत्या. हैदराबादमध्ये झालेल्या ग्लोबल एंटरप्रेन्योरशिप समिटमध्ये त्यांचा सहभाग होता. दुसऱ्यांदा भारतात येताना छान वाटत असल्याचं ट्विट करत त्यांनी म्हटलं होतं.