मुंबई : इजाबेला इलियानॉर ही महिला सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. ही महिला विमानाने प्रवास करत असताना तिला प्रवास करण्यासाठी थांबवले गेले. कारण एयरलाईन्सच्या नियमानुसार तिचे कपडे बरोबर नव्हते. इजाबेला ही एक मॉडेल आहे, तिला विमानाने प्रवास न करू दिल्याची घटना तिने सोशल मीडियावर शेअर केली आणि तिची ही पोस्ट व्हायरल होताच, एयरलाईन कंपनीने तिची माफी मागितली.
नक्की काय घडलं?
इजाबेलाला कामानिमित्त गोल्ड कोस्टवरून मेलबर्नला प्रवास करत होती. जेव्हा ती विमानात येऊन बसली, तेव्हा फ्लाइट अटेंन्डन्टने इजाबेला तिचे कपडे विमानात बसाण्याच्या लायकीच नाही असे सांगितले. आता तुम्ही म्हणाल तिने नक्की असे काय बरे कपडे घातले असावे ? तर इजाबेला ही बिकिनी घालून प्रवास करत होती, असे फ्लाइट अटेंन्डन्टचे म्हणणे आहे.
पण नंतर इजाबेलाने या बद्दल स्पष्टीकरण दिलंय की, तिने जे कपडे घातले होते ते बिकिनी नसून तो क्रॉप टॉप होता. हे तिने फ्लाइट अटेंन्डन्टला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु इजाबेलाच्या विनंती नंतरही तिला त्या कपड्यात विमानात बसू दिले नाही.
फ्लाइट अटेंन्डन्टने आपल्या सहकाऱ्याला बोलावून एक जॅकेट इजाबेलाला दिला आणि तो घालायला सांगितला. इजाबेलाने हा सगळा प्रकार सोशल मीडियावर शेअर केला.
तिने पोस्टमध्ये सांगितले की "हा सगळा प्रकार घडत असताना विमानातले इतर प्रवासी हे सगळ पाहत होते आणि हा प्रकार माझ्यासाठी फार लाजिरवाणा होता." जेव्हा ही पोस्ट व्हायरल झाली, तेव्हा एअरलाईन्सने तिची माफी मागितली आणि सांगितले की फ्लाइट अटेंन्डन्टला एअरलाईन्सच्या पॉलिसी बद्दल गैरसमज होता.