'या' ठिकाणहून जाणाऱ्या विमानांचा होतो अपघात; काय आहे या जागेचं रहस्य?

सर्व प्रयत्न आणि संशोधनानंतरही शास्त्रज्ञांना या रहस्यमय ठिकाणाचं गूढ अजून उकलता आलेलं नाही.

Updated: Jul 20, 2022, 01:25 PM IST
'या' ठिकाणहून जाणाऱ्या विमानांचा होतो अपघात; काय आहे या जागेचं रहस्य? title=

मुंबई : आपल्या पृथ्वीवर अनेक रहस्यांनी भरलेली अशी ठिकाणं आहेत, ज्यांना पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित होतो. आज आम्ही तुम्हाला बर्म्युडा ट्रँगल सारखं एक ठिकाण सांगणार आहोत. याचा अर्थ या ठिकाणावरून जाणारी विमानं कोसळतात. सर्व प्रयत्न आणि संशोधनानंतरही शास्त्रज्ञांना या रहस्यमय ठिकाणाचं गूढ अजून उकलता आलेलं नाही.

आम्ही ज्या रहस्यमय ठिकाणाबद्दल बोलत आहोत ते पश्चिम अमेरिकेतील रेनो, फ्रेस्नो आणि लास वेगास दरम्यान स्थित आहे. नेवाडा ट्रँगल असं या धोकादायक ठिकाणाचं नाव आहे. 

असं म्हणतात की, हे ठिकाण खूप धोकादायक आहे, कारण या ठिकाणाच्या वरून ज्या काही गोष्टी फिरतात त्या कधीच परत येत नाहीत. गेल्या 60 वर्षांत या ठिकाणी दोन हजारहून अधिक जहाजं कोसळली असून त्यात शेकडो वैमानिकांचा मृत्यू झाल्याचं एका अहवालात सांगण्यात आलं आहे. 

इथल्या स्थानिक लोकांच्या म्हणण्याप्रमाणे, या भागात कोणतीतरी अदृश्य शक्ती आहे.

ही शक्ती या ठिकाणाहून जाणाऱ्या विमानांना स्वतःकडे खेचते. इथे एलियन्स असल्याचंही बोललं जातं. मात्र अजूनपर्यंत या रहस्यावरून पडदा उठला नाहीये. 

नेवाडा ट्रँगलचे क्षेत्रफळ इंग्लंडच्या अर्ध्याहून अधिक क्षेत्रफळाच्या बरोबरीचं आहे. या भागात लास वेगास, एरिया-51 आणि योसेमाइट नॅशनल पार्क आहे. या भागात मोठ्या प्रमाणात विमान अपघात झाले आहेत. त्यामुळे लोक याठिकाणी एलियन्स अस्तित्व असल्याबद्दल सांगतात. मात्र या भागात हवेच्या दाबामुळे हे अपघात होऊ शकतात, असं शास्त्रज्ञांचं मत आहे.

नेवाडा ट्रँगल परिसरात विमानं का कोसळतात, हे अद्याप गुपित आहे. कारण अशा घटना हवेच्या दाबामुळे होतात की, त्यामागे अन्य काही कारण आहे, हे वैज्ञानिक सिद्ध करू शकलेले नाहीत.