रशियाच्या विजय दिनाच्या परेडमध्ये भारतीय सैन्याचा सहभाग

भारतीय सैन्याने मॉस्को येथे विजय दिनाच्या परेडमध्ये सहभाग घेतला

Updated: Jun 24, 2020, 02:56 PM IST
रशियाच्या विजय दिनाच्या परेडमध्ये भारतीय सैन्याचा सहभाग  title=

मॉस्को : चीनसोबत सुरू असलेल्या तणावाच्या या काळात भारतीय सैन्याने मॉस्को येथे विजय दिनाच्या परेडमध्ये सहभाग घेतला. यावेळी भारताच्या तिन्ही सैन्याची तुकडी सहभागी झाली. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे देखील रशियाच्या विजय दिन परेडमध्ये सहभागी होण्यासाठी पोहोचले आहेत.

लडाखमध्ये चीनबरोबर सीमा विवाद सुरू असताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह सध्या तीन दिवसांच्या रशिया दौर्‍यावर आहेत. यावेळी राजनाथ सिंह रशियाच्या विजय दिन परेडच्या 75 व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी झाले आहेत. रशियाच्या विजय दिन परेडमध्ये भारताच्या 75 सैनिकांच्या तुकडीनेही भाग घेतला.

गेल्या तीन महिन्यात राजनाथ सिंह यांचा हा पहिला परदेश दौरा आहे. संरक्षणमंत्र्यांच्या या भेटीदरम्यान एस-400 अँटी क्षेपणास्त्र प्रणालीसह अनेक महत्त्वपूर्ण शस्त्रे भारताला मिळतील अशी अपेक्षा आहे. राजनाथ सिंह यांच्या या भेटीदरम्यान रशियाबरोबर सुरू असलेल्या कराराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

भारत रशियाबरोबर शस्त्रास्त्र कराराची लवकर वितरण करण्याची मागणी करू शकेल, ज्यात लढाऊ विमान, टँक आणि पाणबुड्यांचा समावेश आहे. रशियाबरोबर शस्त्रे करारामध्ये सर्वात महत्त्वाची एस-400 संरक्षण यंत्रणा आहे. डिसेंबर 2021 पर्यंत भारताला एस-400 क्षेपणास्त्र संरक्षण यंत्रणा मिळणार होती, परंतु कोविड -१९ मुळे त्याला विलंब होत आहे. याशिवाय सुखोई ३० एम आणि टी-९० टँक देखील लवकरात लवकर देण्याची मागणीही भारत करू शकतो.