३ वर्षात सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही - पंतप्रधान मोदी

तीन वर्षात केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागला नाही, असं सांगत भारतात काय बदल झालेत याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये भारतीय समुदयाशी संवाद साधला. भारत वेगानं प्रगती करतो आहे. तंत्रज्ञानामुळे पारदर्शक कारभार होण्यास मदत झाली आहे. सरकार चालवण्याच्या कार्यपद्धतीत बदल झालेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Updated: Jun 26, 2017, 10:48 AM IST
३ वर्षात सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग नाही - पंतप्रधान मोदी title=

वॉशिंग्टन : तीन वर्षात केंद्र सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागला नाही, असं सांगत भारतात काय बदल झालेत याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टनमध्ये भारतीय समुदयाशी संवाद साधला. भारत वेगानं प्रगती करतो आहे. तंत्रज्ञानामुळे पारदर्शक कारभार होण्यास मदत झाली आहे. सरकार चालवण्याच्या कार्यपद्धतीत बदल झालेत, असंही त्यांनी म्हटलं आहे.

सव्वा कोटी लोकांनी गॅसवरची सबसिडी सोडली आहे. त्याचा गरीबांना फायदा झाला आहे. आत्तापर्यंत एक कोटी पेक्षा जास्त गरीब लोकांना गॅसचं कनेक्शन दिलं आहे, अशी माहितीही त्यांनी दिली. भारतानं नुकतेच १०४ उपग्रहांचं प्रक्षेपण करुन आणि वजनदार उपग्रह अवकाशात  प्रक्षेपित करुन आपली ताकत दाखवली आहे. सर्जिकल स्ट्राईकवरुन जगात कोणीचं भारतावर प्रश्न उपस्थित केला नाही. भारताचं सामर्थ्य जगाला दिसलंय. अशा शब्दात त्यांनी पाकवरील हल्ल्यावर टिप्पणी केली आहे. भारतात गुंतवणुकीचं सर्वोत्तम वातावरण आहे असंही मोदींनी आपल्या भाषणात नमूद केलं आहे.