उत्तर कोरियाने केली क्षेपणास्त्राची चाचणी, जपानवरुन क्षेपणास्त्र सोडल्याने तणाव

 उत्तर कोरियाने पुन्हा एकादा कोणाला न  जुमानता क्षेपणास्त्रची चाचणी केली. दरम्यान, चाचणी करताना हे क्षेपणास्त्र थेट  जपानवरुन सोडले. त्यामुळे तणावात अधिक भर पडलाय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 29, 2017, 12:18 PM IST
उत्तर कोरियाने केली क्षेपणास्त्राची चाचणी, जपानवरुन क्षेपणास्त्र सोडल्याने तणाव title=
संग्रहित छाया

सोल :  उत्तर कोरियाने पुन्हा एकादा कोणाला न  जुमानता क्षेपणास्त्रची चाचणी केली. दरम्यान, चाचणी करताना हे क्षेपणास्त्र थेट  जपानवरुन सोडले. त्यामुळे तणावात अधिक भर पडलाय. उत्तर कोरियाने डागलेले क्षेपणास्त्र  जपानच्या उत्तरेकडील प्रशांत महासागरामध्ये जाऊन पडले. या क्षेपणास्त्राने  २७०० किलोमीटरचे अंतर पार केले आहे.

या आधी उत्तर कोरियाने अमेरिकेला धमकी दिली होती. त्यास अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्याच भाषेत उत्तर दिले होते. याबाबतचे त्यांनी ट्विट केले होते. त्यानंतर उत्तर कोरियाने ही क्षेपणास्त्राची चाचणी घेतली.  युद्धाची परिस्थिती उद्भवल्यास त्यादरम्यान आम्ही माघार घेणार नाही, असा संदेश उत्तर कोरियाने आपल्या आक्रमक पवित्र्याने अमेरिका आणि त्याच्या जवळील देशांना देण्याचा प्रयत्न केलाय.

दरम्यान, जपानवरुन उत्तर कोरिया हे क्षेपणास्त्र डागल्याने तणावात भर पडलाय. त्यातच जपानचे पंतप्रधान शिंजो अॅबे यांनी अमेरिकेला उत्तर कोरियावर दबाव वाढवण्याची मागणी केलेय. हे क्षेपणास्त्र जपानच्या होकाइदो आयलँडवरुन डागण्यात आले. २००९ नंतर पहिल्यांदा उत्तर कोरियाकडून सोडण्यात आलेल्या क्षेपणास्त्राने जपानचा परिसर पार केला आहे, असे म्हटले जात आहे.    

वादाची ठिणगी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी प्योंगयांगने अमेरिकेतील गुआमवर हल्ला करण्याचा इशारा दिला होता. गुआम बेटावर अमेरिकेचे ७ हजार सैनिक तैनात आहेत. भविष्यात उत्तर कोरियाने क्षेपणास्त्रे डागलीच तर फक्त १४ मिनिटांत ही क्षेपणास्त्रे गुआममध्ये विध्वंस घडवतील. या क्षेपणास्त्रांना अमेरिकन भूमीपर्यंत पोहोचायला फक्त १४ मिनिटे लागतील, असे या बेटाच्या महिला सुरक्षा प्रवक्त्याने सांगितलेय.

 युद्धाचा प्रसंग उदभवल्यास फक्त १५ मिनिटात अलर्ट वॉर्निंग सिस्टिम, सायरनच्या मदतीने लगेच नागरिकांना सर्तक केले जाईल, असे या बेटाच्या महिला सुरक्षा प्रवक्त्याने सांगितले होते. उत्तर कोरियाने अमेरिका किंवा आमच्या मित्र राष्ट्रांवर हल्ला केला तर, उत्तरकोरियाने कल्पनाही केली नसेल अशा गोष्टी त्यांच्या बाबतीत घडतील, असा निर्वाणीचा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उत्तर कोरियाला दिलाय.