ख्रिश्चन (Christianity) समुदायाचे धर्मगुरु पोप फ्रान्सिस (pope francis) यांनी जगासमोर एक खळबळजनक सत्य समोर आणलं आहे. अश्लिल व्हिडीओंचा (Adult Video) प्रभाव इतका वाढला आहे की अनेक पाद्री आणि नन्सही याच्या कचाट्यात आल्याची कबुली पोप फ्रान्सिस (pope francis) यांनी दिली आहे. मोठ्या संख्येने पाद्री आणि नन्स देखील अश्लिल व्हिडीओ पाहत असल्याचे पोप फ्रान्सिस यांनी मान्य केले आहे. बीबीसीच्या एका वृत्तामध्ये हा खुलासा करण्यात आला आहे. व्हॅटिकन सिटीमध्ये (Vatican City) डिजिटल आणि सोशल मीडियाच्या (Socail Media) सर्वोत्तम वापराबाबत एका कार्यक्रमात बीबीसीच्या प्रश्नांना उत्तर देताना, 86 वर्षीय पोप फ्रान्सिस (pope francis) यांनी कबूल केले की सोशल मीडियावर अश्लिल व्हिडीओंचा (Adult Video) प्रभाव इतका वाढला आहे की पाद्री आणि नन्स देखील यातून सुटलेले नाहीत. (Nuns and priests watch Adult Video Pope Francis revealed)
अनेक नन्स अश्लिल व्हिडीओ पाहतात, असे पोप फ्रान्सिस म्हणाले. पण त्यांनी धार्मिक क्षेत्राशी संबंधित लोकांना ते टाळण्याचा इशारा दिला आहे. या सत्रादरम्यान पोप यांनी उपस्थित पाद्री आणि धर्म क्षेत्रातील इतरांना सांगितले की, "अश्लिल व्हिडीओ पाहणं हा एक आजार आहे, ज्याने पाद्री आणि नन्सलाही ग्रासले आहे. सैतान आता या माध्यमातून आपल्या जीवनात प्रवेश करत आहे. जर तुम्हाला त्याच्यासाठी वेळ घालवायचा असेल तर कमी वेळ द्या."
पोप फ्रान्सिस यांनी अश्लिल व्हिडीओ पाहणे हे ख्रिश्चन धर्माच्या विरोधात असल्याचे म्हटले आहे. जगभरात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत ज्यात पुजारी आणि नन्सवर लैंगिक छळाचे आरोप झाले आहेत. याशिवाय अश्लिल व्हिडीओंचा प्रभाव असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मात्र पोप फ्रान्सिस यांनी पाद्री आणि नन्स अश्लिल व्हिडीओंच्या विळख्यात अडकल्याचे उघडपणे कबूल करण्याची ही पहिलीच वेळ आहे.