OMG! 100 फुटांची लांब कार कधी पाहिलीय का? यावर हेलिकॉप्टरही उतरू शकतं म्हणे....

बापरे! एवढी मोठी कार तुम्ही यापूर्वी कधीच पाहिली नसेल... ही कार कुठे आणि विशेष काय पाहा

Updated: Mar 12, 2022, 05:14 PM IST
OMG! 100 फुटांची लांब कार कधी पाहिलीय का? यावर हेलिकॉप्टरही उतरू शकतं म्हणे.... title=

मुंबई : कार म्हटलं की डोळ्यासमोर चारचाकी येते. कार महागडी आणि मोठी अलिशान एवढंच डोळ्यासमोर येतं पण एक अशी कार आहे ज्यामध्ये सर्व सुखसोई आहेत. तिचा आकार सर्वात लांब आहे. ही कार जगातली पहिलीच एवढी मोठी कार असले अशी चर्चा होत आहे. ही कार 100 फूट लांब असल्याचं सांगितलं जात आहे. 

या कारची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डमध्ये नोंद करण्यात आली आहे. या कारला ओव्हरेटक करण्याची वेळ आली तरी तुम्ही हैराण व्हाल. या कारची लांबी 30.54 मीटर म्हणजे साधारण 100 फुटाहून जास्त असल्यानं तिची चर्चा होत आहे. 

कारचं वैशिष्ट्यं
ही कार 1986 मध्ये बरबँक, कॅलिफोर्नियामध्ये कस्टमायझर जे ओहबर्गने बनवली होती. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार, तिची लांबी 60 फूट होती आता या कारची लांब वाढवण्यात आली आहे. या कारच्या पुढे आणि मागे असे दोन इंजिन बसवण्यात आले आहेत. जे खूप जास्त शक्तीशाली आहेत. 

या कारला 30.5 मीटरपर्यंत वाढवण्यात आलं आहे. त्यामुळे आधीपेक्षा या कारची लांबी आता वाढली असून 100 फुटांहून जास्त आहे. या डिझायनरने ही कार eBay वरून खरेदी केली आहे आणि त्याची किंमत 2.5 लाख डॉलर्स म्हणजे सुमारे 20 कोटी आहे आणि ती तयार करण्यासाठी 3 वर्षे लागली.

ही कार दोन्ही बाजूने चालवली जाऊ शकते म्हणजे थोडक्यात लोकल किंवा ट्रेनसारखी ही कार पुढून आणि मागून दोन्ही बाजूने इंजिन असल्याने चालवली जाऊ शकते. या कारमध्ये  वॉटर बेड, स्विमिंग पूल,  डाइविंग बोर्ड, जकूजी, बाथटब, मिनी-गोल्फ कोर्स आणि हेलिपॅड सारख्या सुखसोई आणि सुविधा देण्यात आल्या आहेत. 

या कारमधून 75 लोक प्रवास करू शकतात. या कारमध्ये रेफ्रीजरेटर, टेलीफोन, टीव्ही देण्यात आला आहे. अशी कार तुम्ही सिनेमातही कधी पाहिली नसेल. अशा कारमधून कोणाला प्रवास करायला आवडणार नाही. यामध्ये अडचण एकच आहे की कार पार्किंग आणि हाय मेंटेनन्समुळे या कारमधील लोकांची रुची कमी होत आहे.