मुंबई : कोडी सोडवायला कोणाला आवडत नाही? तुम्हालाही असा छंद असेल तर ऑप्टिकल इल्युजन हा तुमच्यासाठी सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. हे केवळ तुमचे मन तीक्ष्ण करण्यातच मदत करत नाही तर तुमची IQ पातळी देखील तपासते. आज आम्ही तुमच्यासाठी अशीच एक ऑप्टिकल इल्युजन टेस्ट घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये तुम्हाला भरपूर भरलेल्या कपमधून रिकामा मग शोधून सांगायचा आहे.
दरम्यान हा रिकामा कप शोधण्यासाठी तुमच्याकडे खेवळ 10 सेकंद आहेत. मग उशीर कशाला करताय? तुमची तीक्ष्ण नजर चालवा आणि रिकामा मग शोधा.
तुम्ही खाली जो ऑप्टिकल इल्युजन पिक्चर फोटो पाहात आहात, त्यात तुम्हाला वेगवेगळ्या रंगांचे भरपूर कप दिसतील. या ब्रेन टीझरला आणखी मजेदार बनवण्यासाठी त्यात अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये गोंधळ निर्माण करण्यासाठी कलाकाराने स्केचमध्ये अस्वल, कोल्हे आणि ससेही काढले आहेत. जर तुम्ही हे आव्हान स्वीकारण्यास तयार असाल तर तुमची वेळ आता सुरू होईल.
हा ब्रेन टीझर तुमची दृष्टी आणि तर्क कौशल्य तपासण्यासाठी तयार करण्यात आला आहे. फोटोमध्ये तुम्हाला अनेक कप दिसतील. त्यातील एक मग रिकामा आहे. आता नीट बघून सांगा रिकामा कप कुठे आहे? जर तुम्हाला अजूनही रिकामा मग दिसत नसेल, तर चित्राच्या कोपऱ्याकडे पहा. आता कदाचित तुम्हाला ते दिसेल.
जर तुम्ही हे कोडं सोडवलं असेल, तर नक्कीच तुमच्याकडे उत्कृष्ट दृष्टी आहे. त्याच वेळी, जर तुम्ही अजूनही रिकामा मग शोधत असाल तर काळजी करू नाका. खाली आम्ही एक चित्र शेअर करत आहोत ज्यामध्ये या कोड्याचं उत्तर दडलेलं आहे. रिकामा कप हा लाल रंगाचा आहे.