Optical Illusion : 'या' फोटोमध्ये लपलाय टीव्हीचा रिमोट; तुम्हाला दिसतोय का बघा?

अनेक लोक या फोटोमध्ये लपलेला रिमोट शोधण्याचं आव्हान देतायत.

Updated: Jul 8, 2022, 12:45 PM IST
Optical Illusion : 'या' फोटोमध्ये लपलाय टीव्हीचा रिमोट; तुम्हाला दिसतोय का बघा? title=

मुंबई : Optical Illusion चे बरेच फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतायत. हे फोटो आपल्या मेंदूला चालना देतात. Optical Illusion सोडवल्यास तुमची बुद्धी शार्प होते. सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होतोय. ज्यामध्ये फर्निचरचे काही तुकडे असतात. हे फोटो अनेक इंस्टाग्राम पेजेसवर पोस्ट करण्यात येतात. अनेक लोक या फोटोमध्ये लपलेला रिमोट शोधण्याचं आव्हान देतायत.

या फोटोमध्ये फर्निचरचे अनेक भाग दिसतायत. यामध्ये सोफा सेट, खुर्च्या, कुशन, झाडं, फुलदाण्या आणि लाईट्स तुम्हाला दिसतील. शिवाय तुमच्याकडे कार्पेट, आरसा, टॉर्च आणि इतर अनेक गोष्टी आहेत. 

काही सेकंदात या फोटोमध्ये रिमोट शोधणं सोपं नाही. तुम्ही काही सेकंदात तेव्हाच रिमोट शोधू शकता, जेव्हा तुम्ही खूप हुशार असाल. किंवा अशा प्रकारची कोडी जर तुम्ही सोडवली असेल तर तुमच्यासाठी हे सोपं असू शकतं. ज्यावेळी तुम्ही पूर्ण एकाग्रतेने पहाल तेव्हा तुम्हाला रिमोट दिसू शकतो.

सर्व प्रयत्न करूनही तुम्हाला फोटोमध्ये रिमोट दिसत नसेल तर यामध्ये रिमोट कुठे आहे ते आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. खालील फोटोमध्ये आम्ही रिमोटला गोल केलं आहे. आता तुम्हाला तो रिमोट दिसला असेल.

हे Optical Illusion सोडवल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं? अशा प्रकारची कोडी सोडवण्यासाठी तुम्ही अशी आव्हानं सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.