हवाना : क्युबामध्ये विमान कोसळून १०० जणांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. क्युबामध्ये प्रवासी विमान हवानाच्या मुख्य विमानतळावरुन उड्डाण केल्यानंतर काही क्षणातंच कोसळले. क्युबाची अधिकृत वेबसाईट क्युबेडिबेटने यासंदर्भात वृत्त दिल्याचे एपी या वृत्तसंस्थेने म्हटलेय.
हवाना विमानतळावरुन बोईंग ७३७ प्रवाशी जेट विमानाने उड्डाण केले. त्यानंतर हे विमान कोसळले. या अपघातात १००हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे. या अपघातात झालेल्या वित्त आणि जीवितहानी झाल्याबाबत अद्याप माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. हवाना विमानतळावरील कर्मचाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिलाय. विमानतळावर सतर्कतेचा इशारा देण्यात आल्याचे येथील कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे, तसे एएनआयच्या वृत्तात म्हटलेय.
Havana airport employee tells that airport workers have been alerted that a passenger jet has crashed on takeoff, reports AP
— ANI (@ANI) May 18, 2018