Bride Weighed In Gold: तुम्ही धान्यतुला किंवा पुस्तकतुलेबद्दल तुम्ही ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल. अनेक चित्रपटांमध्येही अशापद्धतीचे सीन पहायला मिळतात. प्रसिद्ध जोधा अकबर चित्रपटामध्येही असे एक दृष्य आहे. यामध्ये अकबरबरोबर लग्न करताना महाराणीची जोधाची सोने आणि हिऱ्याच्या दागिण्यांनी तुला केली जाते. असाच काहीसा प्रकार एका पाकिस्तानी लग्नात पहायला मिळाला. तसा पाकिस्तान सध्या आर्थिक तंगीमुळे चर्चेत आहे. मात्र दुबईमध्ये झालेल्या एका पाकिस्तानी लग्नातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये लग्नात मुलीची सोन्याच्या विटांनी तुला करण्यात आल्याचं दिसत आहे. मात्र या सोन्याच्या विटांचं नंतर काय केलं हे स्पष्ट झालेलं नाही. या विटा हुंडा म्हणून देण्यात आल्या की त्यांचं पुढे काय झालं याची माहिती समोर आलेली नाही.
ट्विटरवर पोस्ट करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार या व्हिडीओत मुलीची तुला ज्या सोन्याच्या विटांनी करण्यात आली त्या सोन्याच्या वीटा खऱ्या नाहीत. म्हणजेच या वीटा बनवण्यासाठी खरं सोनं वापरण्यात आलेलं नाही. या कॅफ्शनमध्ये हे लग्न पाकिस्तानी जोडप्याचं होतं असाही उल्लेख आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. मुलीच्या वजनाचं सोनं देण्यात आल्याचं दृष्य या व्हिडीओमध्ये दिसत असल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये नवदांपत्य लग्नानंतर रिसेप्शनसाठी स्टेजवर येतं. त्यानंतर मंचावर असलेल्या मोठ्या तराजूच्या एका पारड्यात ही नवविवाहीत तरुणी बसते. दुसऱ्या बाजूच्या पारड्यामध्ये सोन्याच्या विटा ठेवल्या जातात. मुलीच्या वजनाच्या तुलनेत सोन्याच्या विटा ठेवण्यात आल्यानंतर नवरा मुलगा या विटांवर आपल्याकडी तलवार ठेवतो.
Bride measured in gold in Dubai.
Further proof that all the money in the world will not give class to classless individuals. pic.twitter.com/wfAMTJKCEL— Tawab Hamidi (@TawabHamidi) February 25, 2023
हा व्हिडीओ पाहून लोकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. काहींनी हा व्हिडीओ पाहून श्रीमंतीचा दिखावा केला जात असल्याची टीका केली आहे. हे निंदनीय आहे. ही गोष्ट अगदीच क्लासलेस आहे. बाजारामध्ये आपण भाजी घ्यायला गेलो आहोत असं हे पाहून वाटतं, असा टोला एका युझरने लगावला आहे.
No idea, but it is pathetic, despicable and completely classless. It is like going to the vegetable market and buying something by the weight.
— Tawab Hamidi (@TawabHamidi) February 26, 2023
काही लोकांनी हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त केला आहे. एका युझरने लग्नादरम्यान मुलाने मुलीला दिलेली ही मेहर आहे का? असा प्रश्न एकाने विचारला आहे. काहींनी पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीचा संदर्भ देत या सोन्याच्या विटा पाकिस्तानमध्ये दिल्या असत्या तर तिथलं आर्थिक संकट बऱ्याच प्रमाणात कमी झालं असतं असा खोचक टोला लगावला आहे.
अन्य एका दाव्यानुसार या लग्नाची थीम जोधा अकबर चित्रपटाची होती. त्यामुळे या तुलेसाठी वापरण्यात आलेल्या विटा या खोट्या होत्या. या विटांसाठी वापरण्यात आलेला धातू हा खरं सोनं नव्हतं असं सांगितलं जात आहे. केवळ लग्नाच्या थीमला अनुसरुन ही तुला करण्यात आली होती असं म्हटलं जात आहे. मात्र यासंदर्भातील ठोस माहिती समोर आलेली नाही.