कॅमेरा सुरू असलेला मोबाइल घेऊन पोपट उडाला, पुढे कॅमेऱ्यात जे कैद झालं ते मजेशीर... VIDEO

व्हिडीओची सुरूवात अतिशय मजेशीर 

Updated: Aug 26, 2021, 10:45 AM IST
कॅमेरा सुरू असलेला मोबाइल घेऊन पोपट उडाला, पुढे कॅमेऱ्यात जे कैद झालं ते मजेशीर... VIDEO

मुंबई : सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होतोय. या व्हिडीओत एका पोपटाने चक्क एका मुलाचा फोन हिसकावून घेतो. यानंतर कॅमेऱ्यात जे कैद होतं ते अतिशय मजेशीर आहे. आपण या व्हिडीओत पक्ष्यांच्या नजरेतून जग कसं दिसतं ते अनुभवणार आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. 

या व्हिडीओत एक मुलगा पोपटाच्या मागे धावताना दिसत आहे. हा पोपट चक्क मोबाइल घेऊन उडून गेला आहे. या मोबाइलमध्ये पोपटाने पॅनारोमिक व्हिडीओ रेकॉर्ड केलाय. यामध्ये सगळ्याच गोष्टी कॅप्चर झाल्या आहेत. अनेक घर, घरांचे छप्पर, रस्ते. हा पोपट एका क्षणाकरता थांबला देखील होता. तेव्हा सगळ्या लोकांनी पोपटाला हाक मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर तो पुन्हा उडू लागला. 

हा व्हिडीओ संपतो तेव्हा तो एका कारवर बसलेला असतो. 

हा व्हिडीओ ट्विटवर अपलोड करण्यात आला आहे. Fred Schultz या अकाऊंटवरून हा व्हिडीओ अपलोड केलं आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 4 लाख लोकांनी पाहिलं आहे. उंचावरून व्हिडीओ काढण्यासाठी ड्रोनचा वापर करतात. पण हा इकोफ्रेंडली आणि जीवंत असा पोपट आहे. जो सगळ्यागोष्टी कॅमेऱ्यात कैद करतो.