नवी दिल्ली: विमानाला भीषण अपघात झाला असून आतापर्यंत 29 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. तर 40 जणांना या दुर्घटनेतून वाचवण्यात यश मिळालं आहे. दक्षिण फिलीपिन्समध्ये रविवारी लष्करी विमानाचा अपघात झाला. AFPने दिलेल्या वृत्तानुसार विमानात एकूण 92 जण होते, त्यापैकी 29 जणांचा मृत्यू झाला आहे. संरक्षण सचिव डेल्फीन डेल्फिन लोरेन्झाना यांनी सांगितले की या अपघातात 29 जणांचा मृत्यू झाला. तर 40 लोकांना वाचवण्यात यश आलं.
विमान अपघाताची माहिती मिळताच हवाई दलाने निवेदन जारी केलं. दुर्घटनास्थळी सध्या बचावकार्य सुरू आहे. विमान अपघातानंतर परिसरात आग आणि धुराचे लोळ उठले होते. हा अपघात नेमका कसा झाला याची अधिकृत माहिती समोर आली नाही.
#Unfortunate Philippines C130 plane carrying 92 troops crashed after missing the runway at Jolo airport.
India stands with the Philippines. pic.twitter.com/JP7BoW3QPE
— Alpha Defense (@alpha_defense) July 4, 2021
Philippine; Military plane carrying troops crashes; a Lockheed C-130 aircraft mishap on landing, crashed and broke up in flames in the southern Philippines on Sunday with 92 people aboard, at least 17 people had been killed, 43 passengers were rescued - air force statement. pic.twitter.com/hKGNq3I1IC
— @KassMedefer (@KMedefer) July 4, 2021
रॉयर्ट्सच्या म्हणण्यानुसार फिलीपीन एयर फोर्स C-130 एयरक्राफ्ट जोलो द्वीपवर उतरताना हा अपघात झाला. सोशल मीडियावर दुर्घटनेनंतरचे फोटो सोशल मीडियावर समोर आले आहेत. आगीचे लोळ आणि धुरामुळे बचावकार्यात अनेक अडथळे येत आहेत मात्र बाकी लोकांना वाचवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.