Sex Before Marriage Ban in Indonesia : इंडोनेशिया सरकार (Indonesia Govt) लवकरच एक मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे. इंडोनेशियामध्ये लग्नाच्या आधी सेक्स (Sex) करणं किंवा लग्नानंतर कोणा पर पुरुष-स्त्रिसोबत संबंध ठेवण्यावर बंदी घालण्यात येणार आहे. नव्या कायद्यानुसार (New law), केवळ पती आणि पत्नी यांनाच शारीरिक संबंध ठेवण्याचा अधिकार असणार आहे. अशामध्ये जर लग्न झालेल्या व्यक्ती किंवा अविवाहित पुरुष-महिला याचं उल्लंघन करत असतील तर त्यांना एका वर्षाच्या कारावासाची (Jail) शिक्षा होऊ शकते.
आता इंडोनेशिया सरकारने या नव्या कायद्याच्या प्रस्तावाचा ड्राफ्ट तयार केला आहे. त्यामुळे लवकरच इंडोनेशिया सरकार याला तो सभागृहात मांडल्यानंतर कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या तयारीत आहे. इंडोनेशियन हाऊस ऑफ कॉमन्सचे सदस्य बंबांग वुरियंटो यांनी रॉयरला माहिती दिलीये. यामध्ये ते म्हणाले की, हा नवा कायदा आगामी आठवड्याच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये पास केला जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोणीही आपला पती किंवा पत्नीशिवाय कोणा दुसऱ्या सोबत शारीरिक संबंध ठेवेल तर त्याला जास्तीत जास्त एका वर्षाची जेल किंवा दंड भरावा लागू शकतो. अशीच कारवाई अविवाहित व्यक्तींनी शारीरिक संबंध ठेवल्यावर होऊ शकते.
दरम्यान ही कारवाई तेव्हा केली जाईल जेव्हा, एखादी महिला किंवा पुरुष त्यांच्या जोडीदाराविरुद्ध किंवा असं करणाऱ्या अविवाहितांच्या पालकांविरुद्ध तक्रार करेल. न्यायालयात केस सुरू होण्यापूर्वी तक्रार मागे घेतली जाऊ शकते. मात्र न्यायालयात केस सुरू झाल्यानंतर यावर कायद्यानुसार कारवाई केली जाईल.
इंडोनेशियामध्ये जवळपास 3 वर्षांपूर्वी या कायद्याला लागू करण्याची तयार केली जातेय. मात्र या विरूद्ध हजारो लोकं रस्त्यावर उतरून निदर्शन करून लागले, ज्यामुळे सरकारला एक पाऊल मागे घ्यावं लागलं होतं. त्यावेळी निदर्शन करणाऱ्या लोकांनी या कायद्याला 'फ्रीडम ऑफ स्पीच' उल्लंघन असल्याचं संबोधलं होतं.
इंडोनेशियाचे डेप्युटी मिनिस्टर एडवर्ड ओमर शरीफ यांनी रॉयटर्स एजेंसीशी यासंबंधी बातचीत केली. ओमर शरीफ यांनी सांगितलं की, या निर्णयाने आम्हाला गर्व आहे. कारण हे इंडोनेशियन मूल्यं दर्शवतात.