पंतप्रधान मोदी आज संयुक्त राष्ट्र महासभेत, 'या' विषयावर करणार भाष्य

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संयुक्त राष्ट्र महासभेत आज भाषण करणार आहेत. 

Updated: Sep 27, 2019, 10:20 AM IST
पंतप्रधान मोदी आज संयुक्त राष्ट्र महासभेत, 'या' विषयावर करणार भाष्य  title=

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संयुक्त राष्ट्र महासभेत आज भाषण करणार आहेत. २०१४ नंतर प्रथमच ते या मंचावर जगाला संबोधित करतील. २०१४च्या भाषणात मोदींनी योग दिनाची संकल्पना मांडली होती. त्यानंतर २०१५पासून जगभरात २१ जून हा योग दिन म्हणून पाळला जाऊ लागला. त्यामुळे आजच्या भाषणाकडेही जगाचं लक्ष असणार आहे. 

दहशतवादाविरोधात जगानं एकत्र येण्याची मागणी भारतानं विविध मंचांवरून आतापर्यंत वारंवार केली आहे. त्याचा पुनरुच्चार आजच्या भाषणातही अपेक्षित आहेच. शिवाय काश्मीरमध्ये अनुच्छेद ३७० हटवल्यानंतर सरकारने घातलेल्या निर्बंधांविषयी मोदी बोलतात का? याकडे सर्वांचं लक्ष आहे. 

याशिवाय पर्यावरण बदल आणि संवर्धनाविषयी भारतानं केलेलं काम आणि भविष्यात जगभरात याविषयीची जागरुकता वाढवण्यासाठी आपले प्रयत्न या मुद्द्यांवरही मोदींच्या भाषणात भर देण्यात येणार आहे. दरम्यान मोदींनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे देखील संयुक्त राष्ट्र संघाला उद्देशून भाषण करतील. पण मोदी त्यांच्या भाषणावेळी उपस्थित राहणार नसल्याचं सूत्रांनी म्हटले आहे.