राजघराण्याच्या वारसानं जाहीर केला शाही पद सोडण्याचा निर्णय

प्रिन्स हॅरी यांची पत्नी मेगल मार्केलजवळ 'डचेस ऑफ ससेक्स'चा खिताब आहे

Updated: Jan 10, 2020, 02:24 PM IST
राजघराण्याच्या वारसानं जाहीर केला शाही पद सोडण्याचा निर्णय

लंडन : ब्रिटनच्या शाही कुटुंबातील प्रिन्स चार्ल्सच्या यांच्या छोट्या मुलानं हॅरीनं शाही पदाच्या रुपात रॉयल कुटुंबातील वरिष्ठ सदस्यात्व सोडण्याचा निर्णय घेतलाय. यासोबतच, पत्नी मेगन मार्केल हिच्यासोबत आपण आर्थिक स्वरुपात स्वतंत्र होण्याचा विचार करत असल्याचं हॅरीनं स्पष्ट केलंय. अनेक महिने विचार केल्यानंतर आपण या निर्णयावर पोहचण्याचा आणि यावर्षीचा हा संकल्प केल्याचं या दाम्पत्यानं म्हटलंय. सद्य व्यवस्थेत आपल्यासाठी प्रगतीशील भूमिका शोधण्यासाठी उत्सुक आहे.

रॉयल कुटुंबात आपल्याला मिळालेलं पद सोडून स्वत:ला आर्थिककरित्या स्वावलंबी बनवण्याच्या दिशेनं आपण पुढे वाटचाल करत असल्याचं प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्केलनं म्हटलंय. परंतु, सोबतच आपण ब्रिटिश महाराणीचं सहकार्य अगोदरप्रमाणे करत राहणार, असंही त्यांनी स्पष्ट केलंय. 

प्रिन्स हॅरी यांची पत्नी मेगल मार्केलजवळ 'डचेस ऑफ ससेक्स'चा खिताब आहे. या दाम्पत्यानं ब्रिटन आणि अमेरिकेत आपलं आयुष्य व्यतीत करणार असल्याचंही म्हटलंय. 

भौगोलिक संतुलन साधतानाच शाही परंपरेनुसार आपल्या मुलांचं संगोपन आम्ही करू... यासोबतच आम्ही एका नव्या चॅरिटेबल व्हेन्चर लॉन्च करण्याच्या योजनेवर आपलं लक्ष केंद्रीत करणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय. आपण लवकरच आपल्या नव्या योजनांबद्दल सांगणार असल्याचं हॅरी आणि मेगन यांनी स्पष्ट केलंय.