तुम्हाला मास्क वापरायचा कंटाळा आलाय? तर हा उपाय कसा वाटतो?

नोज ओनली मास्‍क (Nose Only Mask) किंवा इटींग मास्क (Eating Mask)या मास्कचा शोध लावला आहे. या मास्कचा फायदा असा आहे की, तुम्हाला काही ही खाताना किंवा पिताना मास्क काढण्याची गरज भासणार नाही.

Updated: Mar 26, 2021, 06:48 PM IST
तुम्हाला मास्क वापरायचा कंटाळा आलाय? तर हा उपाय कसा वाटतो? title=

मॅक्सीको : कोरोनाचा लोकांना इतका कंटाळा आला आहे की, कोरोना कधी जातोय आणि या मास्क पासून आम्हाला कधी सुटका मिळते असं लोकांना वाटत आहे. कारण त्यामुळे लोकांना श्वसनाचा त्रास होत आहे आणि मास्क घालून काम करणे ही अशक्य आहे. जर बाहेर सार्वजनिक ठिकाणी काही खायचे झाले, तरी मास्क काढावं लागतं आणि मास्क काढला तर आपल्याला फाईन भरावा लागतो. यावर काही पर्याय असू शकतो का? तुम्हाला काय वाटंतं?

मॅक्सीकनच्या संशेधकांनी यावर एक भन्नाट कल्पना शोधली आहे. त्यांनी नोज ओनली मास्‍क (Nose Only Mask) किंवा इटींग मास्क (Eating Mask)या मास्कचा शोध लावला आहे. या मास्कचा फायदा असा आहे की, तुम्हाला काही ही खाताना किंवा पिताना मास्क काढण्याची गरज भासणार नाही.

कोरोनापासून असे करणार बचाव

संशोधकांनुसार आपण काही खात किंवा पित असताना कोरोना संक्रमित होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे पूर्णपणे मास्क न हटवता तोंडावर मास्क न लावता फक्त नाकावर मास्क लावल्यामुळे हा व्हायरस पसरण्याचा धोका कमी होतो.

अमेरिकेच्या जॉन हॉपकिन्‍स यूनिवर्सिटीनुसार, नाकातील अशा पेशी ज्यामुळे लोकांना वास येतो, त्याच पेशीमधून कोरोना व्हायरस मुख्यता इंन्ट्री करतो. त्यामुळे जर तुम्ही तुमचे नाक झाकलत तरी याचा फायदा कोरोना संक्रमण रोकण्यासाठी नक्कीच होइल.

जरी संशोधकांनी हा उपाय शोधला असला तरी, जागतिक आरोग्य संघटनेने असे सुचविले आहे की, लोकांनी नाक, तोंड आणि दात झाकलेलाच मास्क घालणे आवशक आहे. तर नोज ओनली कोविड-19 हा मास्‍क तुम्हा फक्त खाता पिता वापरता येऊ शकतो.

मॅक्सीकोमध्ये ही सवलत जरी दिली असली, तरी भारतात अजून तरी अशा प्रकारचा कोणता मास्क बाजारात आलेला नाही, आणि भारत सरकारने या बद्दल आपल्याला अशी सवलत दिलेली नाही.