ब्रिटन : भारतीय वंशाचे ऋषी सुनक (Rishi Sunak) ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनले आहेत. त्यामुळे भारतासह ब्रिटनमध्ये त्यांच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. तसेच ब्रिटनचे नवे पंतप्रधान बनण्यासोबतच ऋषी सुनक (Rishi Sunak Net worth) हे आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आले आहेत. ही चर्चा म्हणजे ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती (Akshata Murthy) यांच्या संपत्तीची आहे. ऋषी सुनक यांची संपत्ती ब्रिटनचे किंग चार्ल्स III (King Charles III) पेक्षा दुप्पट असल्याचे बोलले जात आहे. मात्र सनक खरंच तितके श्रीमंत आहेत की या निव्वळ अफवा आहेत, हे या बातमीतून जाणून घेऊयात.
ब्रिटनमधील भारतीय वंशाच्या आणि ऋषी सुनक (Rishi Sunak) यांच्या कट्टर समीक्षक, लेबर पार्टीच्या खासदार नादिया व्हिटॉम यांनी ऋषी सुनक आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांची संपत्ती ब्रिटनचे किंग चार्ल्स III (King Charles III) पेक्षा दुप्पट असल्याचे ट्विट केले होते. या ट्विटनंतर त्यांच्या सपंत्तीची चर्चा सुरु झाली होती. त्यामुळे प्रत्येकाला हे जाणून घ्यायचे आहे की, पीएम सुनक (Rishi Sunak Net worth) आणि त्यांच्या पत्नीची संपत्ती किंग चार्ल्स III पेक्षा खरोखर जास्त आहे का?
नादिया व्हिटोमने ट्विट करून म्हटले आहे की, ऋषी सुनक (Rishi Sunak) आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती यांची एकूण संपत्ती 730,000,000 पौंड आहे, जी ब्रिटनचे किंग चार्ल्स III च्या निव्वळ संपत्तीच्या जवळपास दुप्पट आहे. तसेच नादियामते, किंग चार्ल्स आणि क्वीन कॉन्सोर्ट कॅमिला यांची एकूण संपत्ती 300 दशलक्ष ते 350 दशलक्ष पौंड आहे.
बिझनेस टुडेच्या रिपोर्टनुसार, या वर्षी मे महिन्यातच ऋषी सुनक (Rishi Sunak) आणि त्यांची पत्नी अक्षता मूर्ती (Akshata Murthy) यांनी द संडे टाइम्स यूकेच्या श्रीमंतांच्या यादीत 222 व्या क्रमांकावर प्रवेश केला. त्यानुसार, दोघांची एकूण संपत्ती 73,000,000 पौंड किंवा 837 दशलक्ष डॉलर्स होती.
मीडियाच्या एका अहवालानुसार, पीएम सुनक आणि त्यांच्या पत्नीच्या निव्वळ संपत्तीचा एक भाग अक्षता मूर्तीच्या (Akshata Murthy) IT दिग्गज इन्फोसिसमधील भागभांडवलातून येतो, ज्याची स्थापना तिचे वडील एनआर नारायण मूर्ती यांनी केली होती. 30 सप्टेंबरपर्यंत, अक्षताकडे आयटी क्षेत्रातील 0.93 टक्के हिस्सा किंवा 3, 89,57,096 शेअर्स आहेत.
'द गार्डियन'च्या हवाल्याने म्हटले आहे की, या जोडप्याच्या यूके आणि कॅलिफोर्नियामध्ये चार मालमत्ता आहेत. यामध्ये केन्सिंग्टनमध्ये £7 दशलक्ष किमतीचे पाच खोल्यांचे घर आणि यॉर्कशायरमध्ये सुमारे 1.5 दशलक्ष पौंड किमतीचे 12 एकरचे जॉर्जियन वाडा यांचा समावेश आहे. तसेच पश्चिम लंडनमधील ओल्ड ब्रॉम्प्टन रोडवर एक फ्लॅट आणि £5.5 मिलियनचा सांता मोनिका बीच पेंटहाऊस.
किंग चार्ल्स III (King Charles III) आणि क्वीन कॉन्सोर्ट कॅमिला यांची एकूण संपत्ती 300 ते 350 दशलक्ष पौंड आहे. क्राउन इस्टेट, डची ऑफ लँकेस्टर आणि डची ऑफ कॉर्नवॉल हे त्याच्या उत्पन्नाचे मुख्य स्त्रोत आहेत, जे सप्टेंबरमध्ये राणी एलिझाबेथ II च्या निधनानंतर त्याला वारशाने मिळाले होते. त्यांची संपुर्ण संपत्ती क्राउन इस्टेट ($19.5 अब्ज), बकिंगहॅम पॅलेस ($4.9 अब्ज), डची ऑफ कॉर्नवॉल ($1.3 अब्ज), डची ऑफ लँकेस्टर ($748 दशलक्ष), केन्सिंग्टन पॅलेस ($630 दशलक्ष) आणि स्कॉटलंडची क्राउन इस्टेट ($592 दशलक्ष डॉलर्स) मधून येते.
दरम्यान दोघांची संपत्ती पाहता ऋषी सुनक यांची किंग चार्ल्स III (King Charles III) पेक्षा जास्त दिसून येत आहे.