स्थलांतर करणाऱ्या ६३ रोहिंग्या मुस्लिमांना होडी तुटून जलसमाधी

म्यानमारमध्ये भडकलेल्या हिंसाचारापासून वाचण्यासाठी बांग्लादेशात स्थलांतर करण्यासाठी धडपडणाऱ्या जवळपास ६० मुस्लिमांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. 

Updated: Sep 29, 2017, 11:04 PM IST
स्थलांतर करणाऱ्या ६३ रोहिंग्या मुस्लिमांना होडी तुटून जलसमाधी  title=
फाईल फोटो

नवी दिल्ली : म्यानमारमध्ये भडकलेल्या हिंसाचारापासून वाचण्यासाठी बांग्लादेशात स्थलांतर करण्यासाठी धडपडणाऱ्या जवळपास ६० मुस्लिमांचा पाण्यात बुडून मृत्यू झालाय. 

संयुक्त राष्ट्राच्या विभागानं दिलेल्या माहितीनुसार, एका होडीमधून प्रवास करत बांग्लादेशात स्थलांतराचा प्रयत्न करणाताना ही दुर्घटना घडली. होडीचे दोन तुकडे झाल्यानं होडी पाण्यात बुडून ६३ रोहिंग्या मुस्लिम समुद्रात बेपत्ता झाले. 

या दुर्घटनेत वाचलेल्या व्यक्तींनी दिलेल्या माहितीनुसार, समुद्र खवळलेला असताना या होडीनं तट सोडला... काही मीटर आता गेल्यानंतर मुसळधार पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे ही दुर्घटना घडली. 

एवढ्या मोठ्या संख्येनं निघालेल्या लोकांचा संपर्क तुटल्यानंतर त्यांच्याबद्दल काहीही माहिती समजू शकलेली नाही...  इंटरनॅशनल ऑर्गनायेशन फॉर मायग्रेशन (आयओएम)नं दिलेल्या माहितीनुसार, ४० लोक अद्यापही बेपत्ता आहेत. या होडीतून जवळपास ८० जण प्रवास करत होते. 

म्यानमारमध्ये उफाळलेल्या हिंसेनंतर २५ ऑगस्टपासून आत्तापर्यंत एखाद्या दुर्घटनेत ठार झालेल्यांमध्ये ही सर्वात मोठी दुर्घटना समजली जातेय. तेव्हापासून आत्तापर्यंत जवळपास पाच लाखांहून अधिक रोहिंग्यांनी बांग्लादेशात आश्रय मिळवलाय.