सायबेरियाच्या शॉपिंग मॉलमध्ये आग, ३७ ठार, ४० जखमी

सायबेरियाच्या शॉपिंग सेंटरमध्ये लागलेल्या भीषण आगीत साधारण ३७ जणांचा मृत्यू झालाय तर ४० हून अधिकजण जखमी झाले. रशियातील शोध समितीने या संदर्भात ही माहीती दिली.

Updated: Mar 26, 2018, 08:34 AM IST
 सायबेरियाच्या शॉपिंग मॉलमध्ये आग, ३७ ठार, ४० जखमी

मॉस्को : सायबेरियाच्या शॉपिंग सेंटरमध्ये लागलेल्या भीषण आगीत साधारण ३७ जणांचा मृत्यू झालाय तर ४० हून अधिकजण जखमी झाले. रशियातील शोध समितीने या संदर्भात ही माहीती दिली.

३७ ठार 

सायबेरियाच्या केमेरोवोतील विंटर चेरी शॉपिंग सेंटरमध्ये आग लागून ३ माहिला आणि एका मुलासहित ३७ जणांचा मृत्यू झाला. यामध्ये ४० जण जखमी धाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

२०० हून अधिकजण सुखरूप 

अग्निशमन दलाचे कर्मचारी बराच वेळ आग विझविण्याचा प्रयत्न करत होते. दरम्यान इमारतीतून २०० हून अधिक जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.