मॉस्को : युक्रेनवर हल्ला (Russia-Ukraine war) केल्यानंतर रशिया आता युरोपवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Putin) यांनी फिनलंड (Finland) आणि स्वीडन (sweden) या दोन देशांना धमकी दिली आहे. युक्रेनमध्ये रशियाची आक्रमकता जसजशी तीव्र होत चालली आहे, त्याचप्रमाणे रशिया इतर देशांवर आपले पाय रोवण्याचा प्रयत्न करत आहे. आता रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी स्वीडन आणि फिनलँडला धमकी दिली आहे की, जर ते नाटोमध्ये सामील झाले तर त्याचे अत्यंत भयानक परिणाम भोगावे लागतील. (Russia warn to finland and sweden)
द मिररमधील वृत्तानुसार, रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा (maria zakharova) म्हणाल्या की, नाटो (NATO) मध्ये सामील झाल्यामुळे त्यांच्या जवळच्या शेजाऱ्यांवर गंभीर परिणाम होतील. रशियाचे युक्रेनवरील आक्रमण तीव्र होत असताना राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी हा इशारा दिला आहे. या दोन्ही देशांची सीमा रशियाला लागून आहे.
झाखारोवा म्हणाले, "फिनलंड आणि स्वीडन नाटोमध्ये सामील झाले तर त्याचे घातक परिणाम आणि काही लष्करी आणि राजकीय परिणाम होऊ शकतात,"
रशिया-युक्रेनमधील युद्धाचा चौथा दिवस (Forth day of russia-ukraine of war)
रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा आज चौथा दिवस आहे. रशियाच्या सैन्याने युक्रेनची राजधानी कीववर हल्ला केला आहे. कीवमध्ये स्फोट आणि गोळीबाराच्या अनेक घटना घडल्या. युक्रेनच्या मदतीसाठी अमेरिका, ब्रिटनसह 28 देश पुढे आले आहेत. याशिवाय जर्मनीने युक्रेनला एक हजार रणगाडाविरोधी आणि ५०० स्टिंगर जमिनीवरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे देण्याचा निर्णय घेतला आहे.
झेलेन्स्की यांचा पंतप्रधान मोदी यांच्याशी संवाद
आदल्या दिवशी, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर चर्चा केली. भारताने शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.