Russia Ukraine War : जगाचा रशियावर काहीही परिणाम नाही, जोरदार हल्ला आणि खेरसॉन शहरावर कब्जा!

Russia Ukraine War : जगाचा आणि अमेरिकेच्या या इशाऱ्याचा रशियावर कोणताही परिणाम झालेला नाही. रशियाने युक्रेनवर आपले हल्ले सुरुच ठेवले आहे.  

Updated: Mar 2, 2022, 02:18 PM IST
Russia Ukraine War : जगाचा रशियावर काहीही परिणाम नाही, जोरदार हल्ला आणि खेरसॉन शहरावर कब्जा! title=

कीव : Russia Ukraine War : अमेरिकेची राष्ट्रपती ज्यो बायडेन (Joe Biden) यांनी रशियाला ( Russia) कडक इशारा देताना निर्बंध लादण्यात येतील, असे स्पष्ट केले. मात्र, जगाचा आणि अमेरिकेच्या या इशाऱ्याचा रशियावर कोणताही परिणाम झालेला नाही. रशियाने युक्रेनवर आपले हल्ले सुरुच ठेवले आहे. युक्रेनची राजधानी कीववर जोरदार हल्ले करण्यात येत आहेत. तर खेरसॉन शहरावर ताबा मिळविल्यानंतर रशियन फौजांनी खारकिव्हमध्ये घुसखोरी केली आहे. CNNच्या रिपोर्टनुसार वेबकॅमेरा आणि व्हिडिओच्या स्क्रिनशॉट जिओलोकेटेड केले गेले आहेत, ज्यावरुन खेरसॉन शहर ताब्यात असल्याचे दिसून येत आहे.

शहराच्या पूर्व भागात लष्कर

रिपोर्टनुसार मंगळवारी उत्तर खेरसॉनमधील एका चौकात रशियन लष्करी वाहने दिसली. वेबकॅम स्क्रीनशॉटमध्ये खेरसॉनमधील स्वोबॉडी स्क्वेअरवर रशियन लष्करी वाहने दिसत आहेत. खेरसॉन प्रादेशिक प्रशासन इमारत स्वोबॉडी स्क्वायर स्थित आहे. अनेक दिवसांच्या गोळीबारानंतर आणि भयानक हल्ल्यानंतर रशियन सैन्य पूर्वेकडील भागात पोहोचले आहे.

महापौरांची फेसबुक पोस्ट 

खेरसॉनमध्ये रशियन लोक मुक्तपणे फिरत असल्याचे व्हिडिओ नवीन पुरावे देत आहेत. रशियन सैन्याने क्रिमियापासून पुढे जाऊन नीपर नदी ओलांडून क्रॉसिंग स्थापित केले आहे. मंगळवारी दुपारी, खेरसॉनचे महापौर इगोर कोलखायेव यांनी फेसबुकवर एक संदेश पोस्ट केला, शहरावर हल्ला होत असल्याचा इशारा दिला. सीएनएनने वृत्त दिले. त्यांनी लिहिले की निवासी इमारती आणि नागरी सुविधा हल्ल्यातून सुटलेल्या नाहीत. आगीमुळे या इमारती जळत आहेत.

7 दिवसांपासून गोळीबार सुरुच

महापौरांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, 'जर रशियन सैनिक आणि त्यांचे नेतृत्व माझे ऐकत असेल तर मी म्हणतो, आमचे शहर सोडा, नागरिकांवर गोळीबार करणे थांबवा. लोकांच्या जीवनासह तुम्हाला हवे असलेले सर्व तुम्ही आधीच घेतले आहे. विशेष म्हणजे रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आज सातवा दिवस आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सातत्याने प्रयत्न सुरू आहेत, मात्र ते काहीही ऐकायला तयार नाहीत.