कीववर रशियाचे जोरदार हवाई हल्ले, युक्रेनचा दावा- 12 हजार रशियन सैनिक मारले

Russia Ukraine War : युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या 17व्या दिवशी रशियाकडून तीव्र हवाई हल्ले सुरु आहेत. तसेच युक्रेननेही दावा केला आहे की, आम्ही आतापर्यंत रशियाचे 12 हजारांहून अधिक सैनिक मारले आहेत.

Updated: Mar 12, 2022, 08:36 PM IST
कीववर रशियाचे जोरदार हवाई हल्ले, युक्रेनचा दावा- 12 हजार रशियन सैनिक मारले

मुंबई : Russia Ukraine War : युक्रेन आणि रशियामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या 17व्या दिवशी रशियाकडून तीव्र हवाई हल्ले सुरु आहेत. युक्रेन सरकारने म्हटले आहे, रशियन सैन्याने मारियुपोल शहरातील एका मशिदीला टार्गेट केले. रशियाने हा हल्ला केला तेव्हा तेथे 80 हून अधिक लोक थांबल्याचे युक्रेनचे म्हणणे आहे. तसेच युक्रेननेही दावा केला आहे की, आम्ही आतापर्यंत रशियाचे 12 हजारांहून अधिक सैनिक मारले आहेत.

रशियाची दीर्घ युद्धाची तयारी  

रशियन सैन्याने डोनबास आणि क्रिमियामध्ये आपले सैन्य घुसविण्यास सुरुवात केली आहे. युक्रेनचे लष्करी गुप्तचर प्रमुख किर्लो बुडानोव यांच्या म्हणण्यानुसार, रशियन सैनिक रशियाच्या मध्य आणि पूर्वेकडील भागांमधून नवीन युनिट्स मिळवत आहे. रशिया आता लवकरच युक्रेनवर ताबा मिळवू शकतो, अशी बातमी आहे. रशियाने कीवला तिन्ही बाजूंनी घेरले आहे.

आणखी 16 हजार सैनिक सहभागी होणार

या युद्धात 16 हजार सैनिक सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन युक्रेनची राजधानी कीव ताब्यात घेण्यापूर्वी आपली तयारी आणखी मजबूत करत आहेत, त्यांनी मध्यपूर्वेतील 16,000 सैनिकांना युद्धात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले आहे. हे सर्व 16 हजार सैनिक कधीही युक्रेनविरुद्धच्या युद्धात रशियाच्या बाजूने सहभागी होऊ शकतात.

रशियन विमानांनी युक्रेनच्या औद्योगिक केंद्राला धडक

या सगळ्या दरम्यान, अनेक मीडिया रिपोर्ट्स कडून सांगण्यात आलेय, शुक्रवारी युक्रेनमध्ये रशियाचे हवाई हल्ले अधिक तीव्र झाले आहेत. रशियन विमाने आणि तोफा देशाच्या पश्चिमेकडील युक्रेनियन हवाई पट्ट्यांना लक्ष्य केले आहे. तर पूर्वेकडील एका प्रमुख औद्योगिक केंद्रावर बॉम्ब हल्ला चढवला आहे.

रशियाने एका दिवसात  टाकले 200 बॉम्ब

अमेरिकेच्या संरक्षण अधिकार्‍यांनी रशियाच्या हवाई मोहिमेबद्दलचे माहिती शेअर केली आहे. त्यात त्यांनी सांगितले की, रशियन पायलट दिवसाला सरासरी 200 बॉम्ब टाकत आहेत, तर युक्रेनच्या सैन्याच्या बाबतीत ही संख्या 5 ते 10 च्या दरम्यान आहे. अमेरिकन अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, युक्रेनियन सैन्याने रशियन विमानांच्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी पृष्ठभागावरून हवेत मारा करणारी क्षेपणास्त्रे, रॉकेट-प्रोपेल्ड क्षेपणास्त्रे आणि ड्रोनचा वापर करण्यावर भर दिला आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x