Russia Ukraine War : रशिया युक्रेन युद्धाचा आजचा सहावा दिवस आहे. रशियाने युक्रेनवर आता तीव्र हल्ले सुरु केले असून निवासी, रुग्णालयं आणि प्रशासकीय इमारतींना लक्ष्य केलं आहे. रशियाकडून आता युक्रेनमधील दुसऱ्या क्रमांकाचं मोठं शहर असलेल्या खारकीव्हवर हल्ला केले जात आहेत.
या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा दुर्देवी मृत्यू झाला आहे (Russian attack kills Indian student in Kharkiv ). नवीन शेखरप्पा ( Naveen Gyanagoudar Shekharappa) असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो मुळचा कर्नाटक राज्यातील बंगुळुरु इथला असल्याची माहिती मिळतेय. वैद्यकीय शिक्षणासाठी नवीन युक्रेनच्या खारकिव्ह शहरात होता. सोमवारी रशियन सैन्याने खारकिव्हमध्ये भयंकर स्फोट घडवला आणि गोळीबार केला. या हल्ल्यात नवीनचा मृत्यू झाला. नवीन अवघ्या 21 वर्षांचा होता.
दोन दिवसांपूर्वीच कुटुंबाशी बातचीत
दोन दिवसांपूर्वीच नवीनचं आपल्या कुटुंबियांशी बोलणं झालं होतं, नवीनने व्हिडिओ कॉल करुन आपल्या कुटुंबाला युक्रेनमधल्या परिस्थितीची माहिती दिली होती. इथं भीषण परिस्थिती असून लवकरात लवकर मायदेशात परतायचं असल्याचं त्याने आपल्या कुटुंबियांना सांगितलं होतं. पण दुर्देवाने तो परतलाच नाही.
p>
परराष्ट्र मंत्रालयाने दिली माहिती
युक्रेनमध्ये बॉम्बस्फोटात भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने ट्विट करुन दिली आहे. सांगायला अतिशय दु:ख होतं की खारकिव्ह इथल्या हल्ल्यात एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. परराष्ट्र मंत्रालय त्याच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे, आम्ही त्याच्या कुटुंबाप्रती तीव्र संवेदना व्यक्त करतो, असं परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी केलं आहे.
With profound sorrow we confirm that an Indian student lost his life in shelling in Kharkiv this morning. The Ministry is in touch with his family.
We convey our deepest condolences to the family.
— Arindam Bagchi (@MEAIndia) March 1, 2022