Eeewwww! हा Video पाहून, विमानात जेवण मागवण्यापूर्वी दोनदा विचार कराल...

 या विमानात कॅटरिंग सुविधा देणाऱ्या कंपनीने या घटनेतून हात झटका आहे. 

Updated: Jul 26, 2022, 12:43 PM IST
Eeewwww! हा Video पाहून, विमानात जेवण मागवण्यापूर्वी दोनदा विचार कराल... title=

Shocking Video : विमानातून प्रवास करण्याचे अनेकांचे स्वप्न असतं. विमानात मिळणाऱ्या सुविधा या लोकांना आकर्षित करतात. विमान प्रवास खाण्यापिण्याची देखील सुविधा देण्यात येते. अनेक तासांचा प्रवास असेल तर जेवणाची पण सोय असते. अगदी व्हेज किंवा नॉनव्हेज जेवण विमानात प्रवाशांसाठी उपलब्ध असतं. एका विमानात जेवण्याबद्दल धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. तुर्कीतील एका एअरलाइन कंपनीच्या फ्लाइटमध्ये फ्लाइट अटेंडंटला जेवण्यात सापाचे कापलेले डोके दिसले. ते पाहून तिच्या काळजाचा ठोका चुकला. एव्हिएशन ब्लॉग वन माईल अॅट अ टाइमनुसार द इंडिपेंडंटनेच्या वृत्तानुसार ही घटना 21 जुलैला तुर्कीमधील अंकारा ते जर्मनीतील डसेलडॉर्फ या सनएक्स्प्रेस फ्लाइटमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. 

बटाट्याच्या भाजीत सापाचे डोके

या घटनेबद्दल या विमानातील केबिन क्रू मेंबरने सांगितले की, जेव्हा मी जेवत होती तेव्हा ही घटना घडली. बटाट्याच्या भाजीमध्ये एक लहान सापाचे डोके लपलेले होते. हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका खाण्याच्या ट्रेच्या मध्यभागी छिन्नविछिन्न सापाचे डोके पडलेले दिसत आहे. 

विमान कंपनीलाही बसला धक्का

ही धक्कादायक घटना लक्षात येताच विमान कंपनीने तातडीने यावर प्रतिक्रिया दिली आहे. आउटलेटनुसार, सनएक्सप्रेसच्या प्रतिनिधीने तुर्की प्रेसला सांगितले की, ही घटना धक्कादायक आहे. तसंच या घटनेनंतर विमान कंपनीने अन्न पुरवठादाराशी केलेला करार निलंबित केला आहे. त्याचप्रमाणे या घटनेची सखोल चौकशी देखील सुरू केली आहे.

एअरलाइनने एका निवेदनात असंही म्हटलं आहे की, "विमान उद्योगातील गेल्या 30 वर्षांहून अधिक अनुभवासह, आम्ही आमच्या विमानात पाहुण्यांना पुरवत असलेल्या सेवा उच्च दर्जाच्या आहेत. विमानातील पाहुण्यांना आणि कर्मचार्‍यांना उत्कृष्ठ सुविधा देणे हे आमचं सर्वोच्च प्राधान्य आहे." तसंच आम्ही आरामदायी आणि सुरक्षित उड्डाण देतो.

कॅटरिंग कंपनीने झटके हात 

तर दुसरीकडे या विमानात कॅटरिंग सुविधा देणाऱ्या कंपनीने या घटनेतून हात झटका आहे. आम्ही कंपनीतील अन्न हे 280 अंश सेल्सिअस तापमानावर शिजतो. मग अशात एखाद्या जेवण्यात सापाचे डोके कसे राहणार, असा दावा या कॅटरिंग कंपनीने केला आहे. आम्ही जेवण दिल्यानंतर यात हे सापाचे डोके ठेवण्यात आले आहे.