Shocking News ! देशातून Dominos pizza हद्दपार

या कंपनीवर गाशा गुंडाळण्याची वेळ 

Updated: Aug 12, 2022, 10:36 AM IST
Shocking News ! देशातून Dominos pizza हद्दपार title=
Shocking Dominos pizza company shuts business in Italy

Domino's pizza : पिझ्झाप्रेमीचं Domino's pizza वर असणारं प्रेम नेमकं किती हे वेगळं सांगण्याची गरज नाही. भरमसाट चीज, विविध फ्लेवर्स, थिक आणि थीन क्रस्ट पिझ्झा अशी Wide Range असणाऱ्या डॉमिनोजला खवैय्यांनी चांगलीच पसंती दिली. पण, आता म्हणजे या कंपनीवर गाशा गुंडाळण्याची वेळ आली आहे. 

देशातून डॉमिनोज लवकरच हद्दपार होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. ज्यामुळं अनेकांना धक्काही बसत आहे. पण, इथं भारतातील पिझ्झाप्रेमींना चिंता वाटण्याचं काहीच कारण नाही. (Shocking Dominos pizza company shuts business in Italy)

या सर्व गोष्टी इटलीमध्ये घडत आहेत. जो देश पिझ्झाचा जनक म्हणून ओळखला जातो. 2015 मध्ये या कंपनीचे काही आऊटलेस्ट इटलीमध्ये सुरु झाले होते. पण, इटालियन नागरिकांना पिझ्झाचं हे अमेरिकन व्हर्जन फारसं भावलं नाही, हेच आता स्पष्ट होत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार आतापर्यंत Domino's pizza ची इटतीलीतील सर्व 29 आऊटलेस्ट बंद करण्यात आली आहेत. 

Domino's pizza इटलीमध्ये नेमका का फसला? 
इटालियन खाद्यपदार्थ त्यांची ठेवण आणि चवीसाठी ओळखले जातात. परिणामी जिथं इटलीमध्ये नागरिक अनेकदा घरच्या घरी तयार झालेल्या जेवणाला पसंती देतात तिथे त्यांना हे फास्ट फूड रुचलं नाही. कोविडची लाट ही कंपनीला काही नवे दिवस दाखवून गेली. 

महामारीच्या निर्बंधांमुळे होम डिलिव्हरीचं प्रमाण वाढलं होतं. पण, स्थानिक खाद्यपदार्थ विक्रेत्यांनीही डिलिव्हरी सुरु केल्यामुळं हे सुखही डॉमिनोजला फार काळ अनुभवता आलं नाही. सरतेशेवटी कंपनीला होणारा तोटा पाहता गाशा गुंडाळणं हाच सर्वोत्तम पर्याय ठरला.