तुम्हीदेखील शिंक रोखण्याचा प्रयत्न करताय? 'या' तरुणाचा जीव जाता जाता राहिला, काय झालं बघा

Trending News In Marathi: एका 34 वर्षीय तरुणाला शिंक रोखणे महागात पडले आहे. शिंक रोखण्याचा प्रयत्न करत करत असतानाच त्याच्याहातून मोठी चूक घडली आहे.   

मानसी क्षीरसागर | Updated: Aug 15, 2023, 05:29 PM IST
तुम्हीदेखील शिंक रोखण्याचा प्रयत्न करताय? 'या' तरुणाचा जीव जाता जाता राहिला, काय झालं बघा title=
shocking man try to hold sneezing gets hole in his throat

Trending News: एखाद्या व्यक्तीला शिंका येणे ही सामान्य बाब आहे. कोणाला कधीही शिंका येऊ शकती. सर्दी किंवा ताप आला असेल तर शिंक येणे ही सामान्य गोष्ट आहे. कधी कधी नाकात धुणीचे कण किंवा अॅलर्जी झाली असल्यास पण शिंका येते. पण कोणीही शिंका आल्यावर अडवून ठेवत नाही. शिंका अडवून ठेवल्यास काय होऊ शकते याचा भयानक प्रत्यय एका व्यक्तीला आला आहे.शिंक दाबून धरल्यामुळं या व्यक्तीच्या गळ्यात छिद्र निर्माण झाले आहे, असा दावा करण्यात येत आहे. 

काय घडलं नेमकं?

बीएमजेच्या एका अहवालानुसार 2018मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये काही तथ्ये मांडण्यात आली होती. एका 34 वर्षीय व्यक्तीसोबत दुर्मिळ घटना घडली आहे. एका वृत्तपत्रात दावा करण्यात आला होता की. हा व्यक्ती रुग्णालयात आपातकालीन विभागात तपासणीसाठी गेला होता तेव्हा तो एकदम फिट होता. मात्र, त्याचवेळी त्याला जोरदार शिंक आली आणि त्यानंतर काही वेळातच त्याला काही गिळायला त्रास होऊ लागला आणि आवाजातही बदल झाल्याचा अनुभव आला. 

डॉक्टरांनी जेव्हा याबाबत त्याच्याकडे चौकशी केली तेव्हा त्यांने सांगितलं की, शिंक थांबवण्यासाठी त्याने नाक दाबले आणि तोंड बंद ठेवले.यानंतर त्याच्या गळ्याच्या भागात सूजही आली आणि वेदनाही होऊ लागल्या. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, 34 वर्षीय रुग्णाचा यापूर्वी कोणतीही मेडिकल हिस्ट्री नव्हती. तसंच, त्याने कोणता धातूही गिळला नव्हता. मग नेमकं काय घडलं असावं अशा प्रश्न डॉक्टरांना पडला होता. 

तरुणाला ताप किंवा श्वासोच्छवासाचा त्रास नव्हता, परंतु शारीरिक तपासणी केली असता त्याच्या घशात आणि मानेमध्ये सूज वाढल्याचे दिसून आले. त्यामुळं डॉक्टरांनी त्याचा एक्स-रे काढायचे ठरवले. एक्सरेचा अहवाल आल्यानंतर डॉक्टरही हैराण झाले. श्वासनलिकेतून हवा बाहेर पडताना दिसली. त्यामुळेच त्याच्या मानेवर सूज आली असावी. मानेमध्ये कोणताही संसर्ग होण्याचा धोका टाळण्यासाठी त्या व्यक्तीला ताबडतोब वैद्यकीय देखरेखीखाली रुग्णालयात दाखल करण्यात आले.त्याची प्रकृती हळूहळू सुधारेपर्यंत त्याला नॅसोगॅस्ट्रिक ट्यूबद्वारे दूध पाजण्यात आले.

या घटनेचा दाखला देत, डॉक्टरांनी  स्पष्ट केले आहे की, शिंका थांबवण्यासाठी नाक दाबणे संभाव्यतः जीवघेणे ठरु शकते. वैद्यकीय अहवालात, डॉक्टरांनी म्हटले आहे की, "नाक आणि तोंड दाबून शिंका रोखणे धोकादायक आहे आणि ते टाळले पाहिजे, कारण यामुळे न्यूमोमेडियास्टिनम, टायम्पॅनिक छिद्र आणि सेरेब्रल एन्युरिझम फुटणे यासारख्या गुंतागुंत होऊ शकतात.