कहानी मैं ट्विस्ट; 19 व्या वर्षी तरूणीनं दिला जुळ्या मुलांना जन्म, परंतु दोन्ही मुलांचे बाप वेगळे?

Shocking News: सध्या जगात आपल्याला अनेक आश्चर्यचकित (Shocking News) करणारे प्रकार पाहायला मिळतात. त्यातून कधी कोणत्या ठिकाणी काय घडले याचीही आपल्याला काहीच शाश्वती नसते. परंतु अशा एका बातमीनं सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे. 

Updated: Jan 17, 2023, 09:51 PM IST
कहानी मैं ट्विस्ट; 19 व्या वर्षी तरूणीनं दिला जुळ्या मुलांना जन्म, परंतु दोन्ही मुलांचे बाप वेगळे? title=

Shocking News: सध्या जगात आपल्याला अनेक आश्चर्यचकित (Shocking News) करणारे प्रकार पाहायला मिळतात. त्यातून कधी कोणत्या ठिकाणी काय घडले याचीही आपल्याला काहीच शाश्वती नसते. परंतु अशा एका बातमीनं सगळीकडेच खळबळ माजवून दिली आहे. ही बातमी वाचून तुम्हाला आश्चर्याचा धक्का (brazil news) बसल्याशिवाय राहणार नाही. एका 19 वर्षाय तरूणीनं जुळ्या मुलांना जन्म दिला खरा, परंतु त्या दोन्ही बाळांचे वडिल मात्र वेगवेगळे आहेत. होय, वैद्यकीय क्षेत्रातला हा चमत्कार वाचून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला असेल परंतु ही बातमी खरी आहे. यामागील शास्त्रीय कारणंही जाणून घेणे आपल्या सर्वांसाठी महत्त्वाचे ठरेल. अशी घटना ही फारच दुर्मिळ असते. परंतु हे मात्र घडलेले आहे. (shocking news 19 year old girl gives birth to twins but both babies fathers are not same brazil news)

हा घटना ब्राझील येथील आहे. येथे राहणारी एक 19 वर्षीय तरूणी गरोदर राहिली आणि तिनं जुळ्या मुलांना जन्म (Twin) दिला. याप्रकरणी तिला आपल्या बाळांचे खरे पिता कोण आहेत याबाबत एक धक्कादायक माहिती कळली. तिनं जेव्हा चाचणी केली तेव्हा तिच्या दोन्ही बाळांचे पिता कोणीतरी दुसरेच आहे असे कळले. हे जाणून तिला आश्चर्याचा धक्काच बसला परंतु खरा कहानी मैं ट्विस्ट अजून येयचा होतो. समोर आलेल्या माहितीनुसार, या दोन्ही बाळांचे वडिल मात्र दोन्ही वेगवेगळे होते. 

समोर आलेली माहिती ऐकून मात्र त्या मुलीला आश्चर्याचा धक्का बसला. हे आपल्यासोबत घडले आहे यावर तिला विश्वासच बसत नव्हता शेवटी तिनं डॉक्टरांकडून खात्री करून घेतली आणि त्यावेळी डॉक्टर म्हणाले की, ही घटना फार दुर्मिळ असते. परंतु हे शक्य आहे. अशा घटना या फार कमी वेळेला घडताना आणि कमी (Pregnancy) लोकांसोबत घडताना दिसतात. 

याची सुरूवात तिच्या मुलांच्या वाढदिवशी झाली. खरंतर या मुलांनी त्यांच्या वडिलांबद्दल आईला विचारणा केली, असे कळते. तेव्हा या मुलांच्या आईनं खात्री करून घेण्यासाठी चाचणी केली. तिला ज्या पुरूषाबद्दल वाटतं होते की तो या मुलांचा बाप असू शकतो त्याच्यासोबत त्यानं चाचणी केली आणि त्या चाचणीअंतर्गत लक्षात की एकाच मुलाचा डीएनए जुळला परंतु दुसऱ्याचा जुळला नाही. त्यामुळे तिला मोठा आश्चर्याचा धक्का बसला. तेव्हा जेव्हा तिनं दुसऱ्या व्यक्तीची चातणी केली तेव्हा त्याचे डीएनए (Dna) दुसऱ्या व्यक्तीशी मॅच झाले. 

काय आहे शास्त्रीय कारणं?

समोर आलेल्या माहितीनुसार, या मुलीनं एका दिवशीच दोघांसोबत सेक्स केला होता त्यामुळे ती दोघांपासून गरोदर राहिली होती. मासिक पाळीच्या दरम्यान दुसरे स्त्रीबीज सोडले जाते आणि सेक्स दरम्यान ते वेगळ्या व्यक्तीच्या शुक्राणूमध्ये मिसळल्यास असा प्रकार घडू शकतो. यासाठी शास्त्रज्ञांनी 'हेटेरो पॅरेंटल सुपरफेकंडेशन' (Heteropaternal Superfecundation) ही संज्ञा वापरली आहे.