मुंबई: सोशल मीडिया आणि युट्यूवर अनेक चॅलेंज एकमेकांना दिले जातात. त्यातून स्पर्धा होत असते. असं एक सोशल मीडियाचं चॅलेंज जीवघेणं ठरलं आहे. 60 वर्षीय व्यक्तीनं वोडका पिण्याचं चॅलेंज घेतलं. पण हे चॅलेंज त्याच्या जीवावर बेतलं आहे.
रशियामध्ये एका 60 वर्षीय व्यक्तीने चॅलेंज पूर्ण करण्यासाठी1.5 लिटर वोडका घेतली. वोडका पित असताना त्याचा मृत्यू झाला. तर त्याचा मृत्यू झाल्याचं प्रेक्षक हे चॅलेंज पूर्ण करताना पाहात राहिले. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे युट्यूबवर लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू असताना हा सगळा प्रकार घडला आहे. रशियातील एका 60 वर्षीय वृद्ध व्यक्तीने यूट्यूबवर चॅलेंज स्वीकारलं. ते पूर्ण करण्यासाठी चक्क 1.5 लिटर वोडका घेतली.
वोडका घेत असतानाच त्याचा मृत्यू झाला आहे. यावेळी युट्यूबरवर लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू होतं. हा सगळा प्रकार प्रेक्षक लाईव्ह पाहात होते. अचानक मृत्यूचा हा थरार पाहून प्रेक्षकांना धक्का बसलाच पण आश्चर्यही वाटलं.
यूट्यूवरून करण्यात आलं होतं चॅलेंज
द इंडिपेंडंटच्या वृत्तानुसार, 'दादाजी' नावाच्या या रशियन व्यक्तीला युट्यूबने चॅलेंजसाठी पैशांची ऑफर दिली होती. हे चॅलेंज 'थ्रॅश स्ट्रीम' म्हणून ओळखले जाते. हे सोशल मीडियावर बरेच ट्रेंड होत आहे. हे चॅलेंज आपल्या जीवावर बेतेल याची पुसटशी कल्पनी या व्यक्तीला नसावी.
थ्रॅश स्ट्रीम चॅलेंज काय आहे?
हे चॅलेंज कोणीही घेऊ शकतं. युट्यूब त्यासाठी चॅलेंज जिंकणाऱ्याला पैसे देण्याची ऑफरही देतं. यामध्ये चॅलेंज स्वीकारणाऱ्याला अपमानकारक किंवा एखादा खतरनाक स्टंट दिला जातो. हे चॅलेंज सुरू करताना त्याचं लाईव्ह स्ट्रिमिंगही केलं जातं. यामध्ये जीवघेणे चॅलेंजेसही दिली जाऊ शकतात.
अशी चॅलेंज जीवघेणी ठरू शकतात याचा विचार तर नक्कीच करायला हवा. हे चॅलेंज जीवघेण ठरल्यानंतर आता कोणावर आणि काय कारवाई होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.