९९ वर्षांतील सर्वात मोठं खग्रास सूर्यग्रहण!

खगोलप्रेमींसाठी सोमवारचा दिवस विशेष पर्वणी घेऊन आला होता. 

Updated: Aug 22, 2017, 09:32 AM IST
९९ वर्षांतील सर्वात मोठं खग्रास सूर्यग्रहण! title=

न्यूयॉर्क : खगोलप्रेमींसाठी सोमवारचा दिवस विशेष पर्वणी घेऊन आला होता. 

गेल्या ९९ वर्षांतील सर्वात मोठे खग्रास सूर्यग्रहण अमेरिकेत दिसले. ग्रहण काळात सूर्य अंदाजे अडीच मिनिटांपर्यंत चंद्राच्या पाठीमागे लपला होता.

भारतीय वेळेनुसार रात्री १० वाजून १५ मिनिटे ते मध्यरात्री १२ वाजून ३० मिनिटांपर्यंत हे ग्रहण पार पडलं.

शतकातील सर्वात मोठ्या सूर्यग्रहणाकडे जगभरातील खगोलप्रेमींचं लक्ष लागलं होतं. आता यापुढील खग्रास सूर्यग्रहण २२५२ मध्ये अमेरिकेत तर कंकणाकृती सूर्यग्रहण २०१९ मध्ये भारतात कोइम्बतूर येथे दिसणार आहे.