जगप्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूलवर मराठीचा झेंडा, श्रीकांत दातार नवे अधिष्ठाता

अमेरिकेतल्या जगप्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूलवर University affairs at Harvard Business School (HBS) मराठीचा झेंडा फडकला आहे.  

Updated: Oct 10, 2020, 05:49 PM IST
जगप्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूलवर मराठीचा झेंडा, श्रीकांत दातार नवे अधिष्ठाता  title=

मुंबई : अमेरिकेतल्या जगप्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूलवर University affairs at Harvard Business School (HBS) मराठीचा झेंडा फडकला आहे. भारतीय वंशाच्या श्रीकांत दातार यांची हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे नवे अधिष्ठाता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

अमेरिकेतल्या जगप्रसिद्ध हार्वर्ड बिझनेस स्कूलवर मराठी ठसा उमटला आहे. भारतीय वंशाचे श्रीकांत दातार यांची हार्वर्ड बिझिनेस स्कूलचे नवे डीन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नितीन नोहरीया यांच्या जागी आता दातार यांची नेमणूक करण्यात आली आहे. 

नोहरीया हे देखील भारतीय वंशाचेच आहेत. येत्या १ जानेवारी २०२१पासून दातार हे नवा पदभार स्वीकारणार आहेत. गेल्या २५ वर्षांपासून श्रीकांत दातार हार्वर्ड बिझनेस स्कूलमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत. दरम्यान, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही दातार यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला आहे.