मुंबई: अफगाणिस्तानमध्ये सुरू असलेल्या तालिबानी दहशतवाद्यांच्या क्रूर कृत्याचा एक भयानक व्हिडिओ समोर आला आहे. गोळ्या संपल्यानंतर अफगाणी कमांडोंनी स्वत:ला तालिबानी लढाऊ सैनिकांच्या स्वाधिन केलं आहे. समोर आलेल्या व्हिडिओत अफगाणी कमांडोंना अटक करण्याऐवजी तालिबानी सैनिकांनी त्यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तालिबानी दहशतवादी 'अल्ला हू अकबर' असं बोलताना ऐकू येत आहे. या घटनेत सर्व 22 अफगाणी कमांडो शहीद झाले आहेत. या घटनेचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत, सोशल मीडियावरदेखील हे व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहेत.
सीएनएनने दिलेल्या अहवालानुसार, तालिबान्यांनी 22 अफगाणी कमांडो मारले आहेत. अफगाणी स्पेशल फोर्सेसच्या कमांडोना शरण जाण्यास सांगितले गेले, पण त्यानंतर लगेचच त्यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. हा व्हिडिओ 16 जूनचा असल्याचं समजतंय.
अफगाण कमांडोना गोळ्या संपवाव्या लागल्या
रेडक्रॉसनेही याला दुजोरा दिला आहे, की त्यांना 22 कमांडोचे मृतदेह सापडले आहेत. प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की, हे शहर ताब्यात घेण्यासाठी कमांडो तालिबान सैनिकांसोबत युद्ध लढत होते. यावेळी त्यांच्या गोळ्या संपल्या आणि त्यांना घेरले गेले. यादरम्यान या कमांडोंनी हवाई सहकार्याची मागणी देखील केली होती, पण ते पोहोचू शकले नाहीत.गोळीबार संपल्यानंतर हे अफगाणी कमांडो पकडण्यात आल्याचा दावा तालिबान्यांनी केला आहे. पण व्हिडिओ व प्रत्यक्षदर्शींच्या माध्यमातून कळतंय, की त्यांची हत्या करण्यात आली.
तालिबान दहशतवाद्यांसोबत 2 तास सामना चालला
सीएनएनच्या अहवालात अफगाणी कमांडोंनी हात वर करत असल्याचं म्हटलं आहे. यादरम्यान शूट न करण्याची विनंतीही करण्यात आली होती. पण तालिबान सैन्याने त्यांचं म्हणणं ऐकलं नाही आणि निशस्त्र सैनिकांवर गोळीबार केला.दुसर्या व्हिडिओमध्ये मृतदेह जमिनीवर विखुरलेले दिसून येत आहेत. प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की, हे कमांडो बख्तरबंद वाहनांमध्ये आले आणि त्यांनी तालिबानी सेनेशी 2 तास युद्ध केले. तालिबान्यांनी त्यांचा बळी घेतला.