Panjshir ताब्यात घेण्याच्या जवळ तालिबान, शोतुल जिल्ह्यात प्रवेश; बजरकमध्ये घमासान

तालिबान आता अमेरिके सैन्याने सोडलेल्या शस्त्रांचा वापर करून अफगाणिस्तानवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात 

Updated: Sep 6, 2021, 06:56 AM IST
Panjshir ताब्यात घेण्याच्या जवळ तालिबान, शोतुल जिल्ह्यात प्रवेश; बजरकमध्ये घमासान title=

काबुल : तालिबान (Taliban) पंजशीर घाटी (Panjshir Valley) ताब्यात घेण्याच्या अगदी जवळ पोहोचले आहेत. तालिबानने शोतुल जिल्ह्यावर (Shottul Distict) ताबा मिळवलाय. येथूनच पंचशीर घाटीत प्रवेश केला जातो. यासोबतच तालिबानने परियन, अनाबा, दाराह आणि रोखा जिल्ह्यावर देखील ताबा मिळवला आहे. 

अगदी जवळच्यांना प्रवेश 

पंचशीर प्रांताची (Panjshir Valley) राजधानी बजरक (Bazarak) वर ताबा मिळवण्यासाठी घमासान सुरू आहे. तालिबानने जवळपास या परिसराच्या आत आणि बाहेर ताबा मिळवलाय. बाहेरून येणाऱ्या अनेकांना प्रवेश देण्यास मनाई करण्यात आली आहे. घाटीत फक्त स्थानिकांना प्रवेश दिला जातोय. तसेच ज्यांच्याकडे प्रवेशाकरता विशेष परमिट आहे. त्यांनाच प्रवेश दिला जात आहे. 

स्थानिकांच पलायन 

लोक मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करत आहेत. लोक सुरक्षित ठिकाणी आश्रयाच्या शोधात कुटुंबासह मैलोन् मैल चालत आहेत. पंजशीर आणि आसपासचे फोन नेटवर्क पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. तालिबानने अहमद मसूदच्या एनआरएफच्या मोठ्या पोस्टवरही कब्जा केला आहे. परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला आहे.

मुजाहिदीनचा ताबा 

तालिबानचा लढाऊ मौलवी मोहम्मद अबुल वफा म्हणाला, "आम्ही पहिल्या जिल्ह्यात पंजशीरमध्ये आलो आहोत. शत्रू पळून गेला आहे. आता इथली परिस्थिती मुजाहिदीनच्या हातात आहे. सर्व प्रांतातील मुजाहिदीन येथे आले आहेत. शत्रूचा प्रदेश आता आपल्या ताब्यात आहे. आमच्या नेत्यांनी पंजशीरच्या जनतेला क्षमा करण्याची घोषणा केली आहे.