वाह रे तंत्रज्ञान! आता जवळ न जाताही पार्टनरला करता येणार Kiss, मिळणार वास्तविक Filling

सध्याच्या धावपळीच्या जगात जोडीदाराला वेळ देता नाही, काही वेळा कामानिमित्ताने आपल्या जोडीदारापासून दूरच्या शहरात किंवा परदेशात राहावं लागतं. या गोष्टींचा विचार करुन शास्त्रज्ञांनी एका उपकरणाचा शोध लावला आहे.

Updated: Mar 17, 2023, 02:05 PM IST
वाह रे तंत्रज्ञान! आता जवळ न जाताही पार्टनरला करता येणार Kiss, मिळणार वास्तविक Filling title=

Chinese Kissin Device: आपल्या जोडीदाराला किस (Kiss) करण्यासाठी तो किंवा ती आता जवळच असण्याची गरज नही. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा कुठेही आणि कधीही आपल्या जोडीदाराला किस करु शकता येणार आहे. यासंदर्भात चीनने (Chiana) एका नव्या उपकरणाचा (Device) अविष्कार केला आहे. या उपकरणाला Real Physical Intimacy नावाने प्रमोट केलं जात आहे. जोडीदारापासून लांबच्या शहरात किंवा परदेशात राहाणाऱ्यांसाठी हे उपकरण फायदेशीर ठरू शकणार आहे. 

हे उपकरण सोशल मीडियावर चांगलंच (Social Media) व्हायरल होत आहे. या उपकरणाच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या जोडीदाराला (Partner) दूरवरुनही किस करु शकता. या उपकरणामुळे खरीखुरी अनुभूती घेऊ शकता असा दावा उपकरण बनवणाऱ्या तंज्ज्ञांनी केला आहे. किसिंग उपकरणामध्ये अनेक प्रकारचे सेन्सर (Sensor) उपलब्ध आहेत जे अतिशय वास्तविक अनुभव देतात.

Chinese Kissing Device
या उपकरणामध्ये सिलिकॉन लिप्स असणार आहेत, याशिवाय किसिंगचा वास्तविक अनुभव घेण्यासाठी किसिंग उपकरण प्रेशर सेंसर बसवण्यात आलं आहे. तज्ज्ञांनी केलेल्या दाव्यानुसार वापरकर्त्यांच्या ओठांचा दाब, वेग आणि तापमान कॉपी करून, यात वास्तविक अनुभव देण्याची क्षमता आहे. 

डिव्हाईस कसं काम करणार?
किसिंग डिव्हाईसचा वापर करण्यासाठी वापरकर्त्याला हे उपकरण आपल्या स्मार्टफोनमध्ये (Smartphone) डाऊनलोड करावं लागणार आहे. त्यानंतर आपल्या पार्टनरबरोबर ते उपकरण पेअर करण्याचा पर्याय देण्यात आला आहे. दोघांनी उपकरण पेअर केल्यानंतर एक जोडीदाराला दुसऱ्या जोडीदाराशी व्हिडिओ कॉलिंगद्वारे (Video Calling) कनेक्ट व्हावं लागेल. 

हे सिलिकॉन उपकरण 3D लिप्ससह मिळतं. चायनात हे उपकरण लाँग डिस्टंट लवर्स मिरॅकल किसिंग डिव्हाईस नावाने ऑनलाईन रिटेल प्लॅटफॉर्मवर विकलं जातं. याची किंतम चीनमध्ये 260 युआन किंवा 38 डॉलर इतकी आहे. भारतीय रुपयात याची किंमत 3433 रुपये इतकी असल्याचं सांगितलं गेलंय. या उपकरणाला आपल्या फोनमध्ये ब्ल्यूट्यूथद्वारे कनेक्ट करावं लागतं. 

डिव्हाईस बनवण्याचं कारण
चीनमध्ये राहाणारे जियांग झोंगली या शास्त्रज्ञाने हे उपकरण तयार केलं आहे. जियांग झोंगली हे कामानिमित्ताने आपल्या पत्नीपासून दूर राहात होते. केवळ फोनद्वारे ते एकमेकांशी बोलायचे. त्यामुळे जियांग झोंगली यांनी असं एखादं उपकरण बनवण्याचा निर्णय घेतला. जियांग यांनी 2019 मध्ये या उपकरणाच्या पेटंटसाठी निवेदन दिलं होतं. त्यानंतर या उपकरणाला मान्यताही देण्यात आली.