मगरीने भल्या मोठ्या अजगरावर केला हल्ला, अन्... व्हिडिओ होतोय व्हायरल

सोशल मीडियावर व्हायरल होतोय व्हिडिओ

Updated: Jul 30, 2021, 06:11 PM IST
मगरीने भल्या मोठ्या अजगरावर केला हल्ला, अन्...  व्हिडिओ होतोय व्हायरल

मुंबई : जगातील अनेक घटना कधी कधी कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर त्याला लाखो लोकांकडून शेअर केल्या जातात. कारण त्या कधी सहज पाहायला मिळत नसतात. अशीच एक घटना कॅमेऱ्यात कैद झाली आणि हजारो लोकांनी आतापर्यंत हा व्हिडिओ पाहिला आहे.

जगात सापांच्या अनेक जाती आढळतात. ज्यामध्ये अजगर हा सर्वात घातक मानला जातो. त्याचा आकार ही इतर सापांच्या तुलनेत मोठा असतो. अजरग जेव्हा शिकार करतो. तेव्हा त्याच्या तावडीतून सुटणं कठीण असतं.

मगरला खाऱ्या पाण्यातील राजा मानले जाते. मगर देखील चतुरतेने शिकार करतो. सध्या सोशल मीडियावर असा एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यामध्ये मगरीने अजगराची शिकार केली आहे.

एका तलावाच्या ठिकाणी एक मोठा अजगर दिसत आहे. मोठा अजगर पुढे जात असताना मगरीची नजर त्यावर पडते. यानंतर ही मगर त्यावर हल्ला करते.

मगर अजगराला पाण्यात ओढून नेते. अजगर मगरीच्या तावडीतून सुटण्याचा खूप प्रयत्न करतो. पण तो अपयशी ठरतो. हा व्हिडिओ ट्विटर वर शेअर केला जात आहे.