Hong Kong Model Murder: महाराष्ट्रातील मुलगी श्रद्धा वालकरची दिल्लीत हत्या (Shraddha Walkar Murder) झाल्यानंतर संपूर्ण देश हादरला होता. श्रद्धाची तिचाच प्रियकर आफताब पूनावालाने (Aftab Poonawala) हत्या केल्यानंतर मृतदेहाच तुकडे करुन फ्रीजमध्ये ठेवले होते. यानंतर त्याने रोज रात्री घराबाहेर पडत मृतदेहाच्या तुकड्यांची विल्हेवाट लावली होती. दरम्यान या हत्येशी साम्य असणारी घटना हाँगकाँगमध्ये घडली असून संपूर्ण देशालाच धक्का बसला आहे. कारण जिची हत्या झाली आहे ती एक प्रसिद्ध मॉडेल होती. घरातील फ्रीजमध्येच तिच्या मृतदेहाचे तुकडे पोलिसांना सापडले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
South China Morning Post ने दिलेल्या वृत्तानुसार, Abby Choi असं हत्या झालेल्या मॉडेलचं नाव आहे. तिच्या गावातील साररच्या घरात मृतदेहाचे तुकडे पोलिसांना सापडले होते. फ्रीजमध्ये मॉडेलचे दोन्ही पाय कापून ठेवण्यात आले होते. याशिवाय पोलिसांना घरात तिचं आयकार्ड, क्रेडिट कार्ड आणि इतर गोष्टी सापडल्या होत्या. तसंच हत्येसाठी वापरण्यात आलेलं मांस ग्राइंडर, कटर, लांब रेनकोट, हातमोजे आणि मास्कही पोलिसांना सापडले होते. दरम्यान पोलिसांनी अद्याप मॉडेलचं मुंडकं, धड आणि हात सापडलेले नाहीत.
हत्येप्रकरणी पोलिसांनी मॉडेलच्या पूर्वाश्रमीच्या पतीच्या तीन नातेवाईकांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक केलेल्यांमध्ये पूर्वाश्रमीच्या पतीचे आई-वडील आणि भावाचा समावेश आहे. पोलीस सध्या पतीचा शोध घेत असून तो फरार आहे. पोलिसांनी सर्वांविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.
पोलीस प्रशासनाने या हत्येमागे आर्थिक वाद असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. मॉडेलची तिचा पूर्वाश्रमीचा पती आणि त्याच्या कुटुंबासह लाखो हाँगकाँग डॉलर्सवरुन आर्थिक वाद सुरु होता. मॉडेल योग्यप्रकारे संपत्ती हाताळत नसल्याने ते सर्व नाराज होते. यातूनच त्यांनी तिच्या हत्येची सुपारी दिली आणि इतक्या क्रूरपणे ठार केलं असा पोलिसांचा अंदाज आहे.
मॉडेल बेपत्ता झाल्यानंतर शुक्रवारी संध्याकाळी पोलिसांनी तिचं सासरचं घर गाठलं होतं. पोलीस घराचा दरवाजा तोडून आत शिरले तेव्हा फ्रीजमध्ये दोन्ही पाय कापून ठेवण्यात आल्याचं दिसलं. घराची छडती घेतली असता तिचं ओळखपत्र, क्रेडिट कार्ड आणि इतर गोष्टी पोलिसांना सापडल्या.
मॉडेलची हत्या करण्यासाठीच हे घऱ सासरच्या लोकांनी काही आठवड्यांपूर्वी भाड्याने घेतल्याचं तपासात समोर आलं आहे. हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करण्यासाठी वापरण्यात आलेलं साहित्यही पोलिसांनी जप्त केलं आहे. दरम्यान पोलिसांना मृतदेहाचे इतर तुकडे सापडले नसल्याने तपास सुरु आहे.