काश्मीर : जम्मू-काश्मीरच्या त्राल सेक्टरमध्ये तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. दहशतवादी आणि भारतीय जवानांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. हे दहशतवादी हिज्बुल मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेशी संबंधित असल्याची माहिती काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार यांनी दिली. या दहशतवाद्यांकडे एके-४६, पिस्तुल आणि ४ ग्रेनेड असा साठा होता. हा साठा आता जप्त करण्यात आला आ
त्राल याठिकाणी दहशतवादी लपून बसले होते. ही माहिती जवानांना कळताच भारतीय सैन्य दल, स्थानिक पोलीस आणि केंद्रीय राखीव सुरक्षा दलाच्या पथकांनी संयुक्तपणे शोधमोहीम सुरू केली. त्यानंतर दहशदवाद्यांकडून गोळीबार सुरू झाला. हे दहशतवादी एका घरात लपून बसले होते.
Jammu and Kashmir: Three terrorists killed in the ongoing operation at Mandoora Tral area of Awantipora.
(visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/fpM5KGyvJP
— ANI (@ANI) January 29, 2021
दहशतवाद्यांच्या गोळीबाराला सुरक्षा दलानेही गोळीबार केला. त्यात तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा पथकाला यश आले. चकमकीत ठार झालेले दहशतवादी नव्याने दहशतवादी संघटनेत सामील झाले होते. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात एक जण संघटनेत सामील झाला होता तर अन्य दोघे जानेवारी महिन्यात संघटनेत सामील झाले होते.