Aliens : 2023 मध्ये एलियन्स आणि पृथ्वीवरील लोकांमध्ये युद्ध होणार; टाईम ट्रॅव्हलरने तारीखही सांगितली

टाईम ट्रॅव्हलरने केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. 2023 या वर्षात मानवाला अनेक संकटांचा सामना करावा लागणार आहे.

Updated: Jan 21, 2023, 11:00 PM IST
Aliens :  2023 मध्ये एलियन्स आणि पृथ्वीवरील लोकांमध्ये युद्ध होणार; टाईम ट्रॅव्हलरने तारीखही सांगितली title=

Time Traveller On Aliens : खरंच एलियन अस्तित्वात आहेत का? असतील तर ते मानवाच्या संपर्कात आहेत का? या प्रश्नांची अद्याप ठोस उत्तरे मिळाली नाहीत. वैज्ञानिक सातत्याने एलियन्सशी संपर्क साधण्यासाठी संशोधन करत आहेत. त्यातच आता  टाईम ट्रॅव्हलरने (Time Traveller) एलियन्सबाबत केलेल्या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. 2023 मध्ये एलियन्स (Aliens) आणि पृथ्वीवरील लोकांमध्ये युद्ध होईल असा दावा टाईम ट्रॅव्हलरने केला आहे. इतकच नाही तर युद्धाची तारीखही जाहीर केली आहे. 

या टाईम ट्रॅव्हलरने भविष्यातील 2869 सालातून परत आल्याचा दावा केला आहे.  2023 मध्ये एलियन आणि मानव यांच्यात युद्ध होईल. समुद्रात आश्चर्यकारक शोध लागतील. यासोबतच भयानक भूकंपही येईल. एलियन आणि मानव यांच्यातील हे युद्ध पृथ्वीपासून अंतराळात देखील होणार असल्याचा दावा या टाईम ट्रॅव्हलरने केला आहे. या टाईम ट्रॅव्हलरने टिकटॉकवर व्हिडिओ शेअर करत हे दावे केले आहेत.  2023 च्या अखेरीस पृथ्वीवरील लोकांना अनेक नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागेल असा इशाराही या टाईम ट्रॅव्हलरने दिला आहे.

हे दावे करणाऱ्या टाईम ट्रॅव्हरलचे  beyondtimetraveller नावाने  Tiktok वर त्याच्या प्रोफाइल आहे. एलियन्स आपल्या दिशेने येत आहेत.  एलियन आणि मानव यांच्यात अंतराळ युद्ध सुरू होणार आहे. 18 मार्च 2023 रोजी विस्लार, अलास्का येथे 8.1 तीव्रतेचा भूकंप होईल. भयंकर आपत्ती येईल. 26 जून 2023 पॅसिफिक महासागरात ब्लू व्हेलपेक्षा मोठा प्राणी सापडेल हा प्राणी 350 फूट लांब असेल.  1 ऑक्टोबर 2023 रोजी गोलोथ नावाची एक प्रजाती दिसेल. जे मानवापेक्षा कितीतरी जास्त बुद्धिमान असेल असे दावे या टाईम ट्रॅव्हरले केले आहेत.

टाइम ट्रॅव्हल म्हणजे भविष्यात किंवा भूतकाळात डोकावणे. अनेक जण आपण आपण टाईम ट्रॅव्हलर असल्याचा दावा करतात. त्यापैकीच हा एकजण आहे. या पूर्वी देखील अनेक टाईम ट्रॅव्हलरनी एलयनशी संपर्क झाल्याचा दावा केला आहे.