Treading Viral Video : मुलांना लहानाचं मोठं करणं हे आजच्या काळातील सर्वात मोठं चॅलेंज (Big challenge) आहे. आज आई-वडील (mother-father) दोघेंही कामावर जातात. त्यात पूर्वीसारखे एकत्र कुटुंब दिसतं नाही. हम दो हमारा एक असं काहीस कुटुंब (family) आजकाल बघावं तिकडे दिसतं. वाढलेली महागाई (inflation) आणि नोकरीचा (job) ताण त्यामुळे एक मुलावर पालक (parents) थांबतात. लहान मुलांसोबत क्वालिटी टाइम (Quality time) घालवायला पाहिजे असं तज्ज्ञांकडून वारंवार सांगण्यात येतं.
मुलांना जर काही सवयी लावायच्या असतील तर त्याची मुळ हे लहानपणापासूनच रुजवावी लागतात. लहान मुलांशी खेळून त्यांच्यासोबत एखादं काम करुन त्यांना आजूबाजूच्या परिस्थितीतून घडवायला हवं. मुलांना जिंकण्याचा आनंद काय असतो हे कळवा हे दर्शविणारा एक व्हिडीओ (Video) सध्या सोशल मीडियावर (Social media) धुमाकूळ घालतो आहे.
तुम्ही आम्ही अनेक जणांचं लहानपण हे WWE पाहण्यात गेलं आहे. आजही अनेक जण WWE साठी वेडे आहेत. सोशल मीडियावर व्हायरल (Viral) होत असलेल्या व्हिडीओमधून पिता-पुत्राची जोडी सर्वांचं मनं जिंकत आहे. (Treading Video Father Son Fight viral on Social Media NM)
व्हिडीओमध्ये दिसणारा गोंडस अशा लहान मुलांच्या आनंदासाठी वडिलांनी त्याचासाठी पराभव पत्करताना दिसतं आहे. पिता-पुत्र या व्हिहीओमध्ये WWE रेसलिंग खेळताना दिसतं आहे. तो गोंडस लहान मुलं WWE रेसलिंगमधील सुपरस्टार्सचे (Superstars in wrestling) प्रत्येक मूव्ह (Move) एकदम हुबेहुब करताना दिसतं आहे.
DDT, Swanton bomb, 3 count आणि Hook up the legs हे WWE सुपरस्टार्सचे मूव्ह या चिमुकल्याने करुन WWE प्रेमींसोबतच नेटकऱ्यांनी आश्चर्यचकित केलं आहे. सोशल मीडियाचे प्लटफॉर्म इंस्टाग्राम (Instagram) असो किंवा ट्विटरवर (Twitter) हा व्हिडीओ सगळ्याकडे धुमाकूळ घालतो आहे.
'जिंदगी गुलजार है!' या ट्विटर अकाऊंटवरही हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. 'जो मांगू दे दिया कर ए ज़िन्दगी, कभी तो मेरे पापा जैसी बन कर दिखा' अशा टॉग लाईनखाली हा व्हिडीओ टाकण्यात आला आहे. मुलाच्या आनंदात हरवलेल्या वडिलांचा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेतं आहे.
जो मांगू दे दिया कर ए ज़िन्दगी,
कभी तो मेरे पापा जैसी बन कर दिखा। pic.twitter.com/wM6xXOs339— ज़िन्दगी गुलज़ार है ! (@Gulzar_sahab) September 23, 2022
पण एक आर्वूजन सुचना आहे, सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी या व्हिडीओमधील फाईट लहान मुलांनी खऱ्या आयुष्यात करु नये. हा एक लहान मुलांच्या आनंदासाठी वडिलांनी सगळी काळजी घेऊन व्हिडीओ तयार केला आहे. तुम्ही मुळीच असं काही करु नका.