'या' देशाने ट्रान्स लोकांना केलं 'मानसिक रुग्ण' घोषित, सरकार देणार मोफत उपचार

एका देशाने अधिकृतपणे ट्रान्सजेंडर, नॉन-बायनरी आणि इंटरसेक्स लोकांना 'मानसिकदृष्ट्या आजारी' म्हणून घोषित केलं आहे. अशा लोकांना सरकारतर्फे मोफत उपचार दिला जाणार असल्याचंही या देशाने जाहीर केलं आहे. 

राजीव कासले | Updated: May 16, 2024, 04:40 PM IST
'या' देशाने ट्रान्स लोकांना केलं 'मानसिक रुग्ण' घोषित, सरकार देणार मोफत उपचार title=
संग्रहित फोटो

Transgender Community : ट्रान्सजेंडर, बायनरी नसलेल्या आणि इंटरसेक्स लोकांबद्दल वेगवेगळ्या देशात वेगवेगळे नियम आहेत. काही देशात ट्रान्सजेंडरला अधिकृत मान्यता आहे. तर काही देशात त्यांचा आवाज दाबण्यात आला आहे. आपल्या हक्कांबाबत टान्सजेंडर कम्युनिटीचा लढा सुरुच आहे. अशात एक मोठी बातमी समोर आली आहे. दक्षिण अमेरिकेतल्य पेरू या देशाने ट्रान्सजेंडरबाबत मोठा निर्णय घेतला आहे. न्यूयॉर्क पोस्टने दिलेल्या बातमीनुसार ट्रान्सजेंडर, नॉन बायनरी आणि इंटरसेक्स लोकांना मानसिग रुग्ण घोषित करण्यात आलं आहे. अशा लोकांना मोफत उपचार दिले जाणार असल्याचंही पेरू देशातल्या सरकारने जाहीर केलंय. 

पेरू देशाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार देशातील आरोग्य सेवा ही ट्रान्स कम्युनिटीसाठी देखील उपलब्ध आहे हे पटवून देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सामान्य लोकांप्रमाणेच ट्रान्स लोकांचं मानसिक आरोग्य जपण्याची संपूर्ण हमी दिली जाईल असंही ओरोग्य विभागाने स्पष्ट केलं आहे.  या निर्णयानुसार, ट्रान्स आणि इंटरसेक्स लोक मानसिकदृष्ट्या आजारी आहेत हे दर्शवण्यासाठी आवश्यक आरोग्य विमा योजनांची भाषा बदलली जाईल. पण ट्रान्स आणि इतर LGBTQ+ लोकांना उपचार करुन घेण्याची सक्ती केली जाणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. 

LGBTQ+ कडून निषेध
पेरु देशाच्या आरोग्य मंत्रालयाने निर्णयामागचे हेतू स्पष्ट केला असला तरी  LGBTQ+ ची लोकं आणि त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्थांनी या निर्णयाचा निषेध केला आहे.  LGBTQ+ लोकांचे अधिकार आणि त्यांची सुरक्षेवर या निर्णयामुळेवर धोका निर्माण असल्याचं त्यांचं म्हणणं आहे. समलैंगिकतेला गुन्हा नसल्याचं पटवून देण्यासाठी 100 वर्ष लागली. आता ट्रान्स लोकांना मानसिक रुग्ण घोषित करणं यापेक्षा काय वाईट असणार असं OutfestPeru चे एडिटर झीन्सर पकाया यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर म्हटलं आहे. जोपर्यंत सरकार हा निर्णय मागे घेत नाही तोपर्यंत स्वस्थ बसणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिलाय.

साऊत सायंटिफिक युनिव्हर्सिटीचे वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे पर्सी मायटा-ट्रिस्टन यांनी हा निर्णय म्हणजे  LGBTQ+ समुदायाबद्दल जागरुकता निर्माण करण्यात कमतरता असल्याचं म्हटलं आहे. 

LGBTQ+ बद्दल समज-गैरसमज
समलैंगिक संबंधांबाबत (Homosexual Relationship)  जगातील अनेक देशांमध्ये वाद सुरु आहे. काही देशात समलैंगिकता म्हणजे पाप आणि समाजाविरुद्ध असल्याने त्याला मान्यता नाहीए. तर काही देशात समलैंगिक संबंधांना मान्यता असून अनेक कपल्स आनंदाने राहात आहेत. समलैंगिक व्यक्तींचे म्हणजे स्त्री-स्त्री अथवा पुरुष-पुरुष यांच्यातील लैंगिक संबंध म्हणजे समलिंगी संबंध. पुरुषाचे पुरुषाशी लैंगिक संबंध असतील तर अशा व्यक्तींना 'गे' (Gay) म्हटलं जातं. स्त्रीचे स्त्रीशी लैंगिक संबंध असतील, तर अशा व्यक्तींना 'लेस्बियन' (Lesbian) म्हटलं जातं.

दक्षिण आफ्रिकेत विधेयक
दक्षिण आफ्रिकेतील युंगाडा (Uganda) देशाच्या संसदेत विधेयक मंजूर करण्यात आलं असून या विधेयकानुसार समलैंगिक संबंध गुन्हा असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. या विधेयकानुसार समलैंगिक संबंध करताना व्यक्ती आढळल्यास त्याला थेट मृत्यूदंडाची (Death Penalty) शिक्षा होऊ शकते. आफ्रिकेतील 30 हून अधिक देशांमध्ये समलैंगिक संबंधांना विरोध असून त्याविरोधात कठोर शिक्षेची तरतूद आहे.