Trending News : अपघातांच्या किंवा एखाद्या मोठ्या दुर्घटनेत कोर्टाकडून त्या घटनेला जबाबदार असणाऱ्या व्यक्तीला दंड ठोठावला जातो. काही प्रकरणात पीडित व्यक्तीला आर्थिक मोबदला देण्याचा आदेश कोर्ट देतं. पण केवळ एक कॉफी अंगावर पडल्याने हॉस्टेलला कोट्यवधी रुपयांचा भुर्दंड पडल्याचं तुम्ही कधी ऐकलं आहे का? हे प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. वेटरच्या हातून चुकून या महिलेच्या अंगावर कॉफी (Coffee) पडली, पण हे प्रकरण हॉटेलला महागात पडलं.
काय आहे नेमकी घटना?
ही घटना जॉर्जियातली (Georgia) असून डोनट आणि कॉफी ब्रांड असलेल्या डंकिनच्या (Dunkin) आऊटलेटमध्ये ही घटना घडली. इथं एक वृद्ध महिला कॉफी पिण्यासाठी आली होती. या महिलेने कॉफी ऑर्डर केला. वेटरने या महिलेला कॉफीचा मग आणून दिला. पण कप देताना त्याच्या हातून कप सुटला आणि गरम कॉफी त्या महिलेच्या अंगावर सांडली. यामुळे महिला चांगलीच भाजली, हे प्रकरण कोर्टात (Court) गेलं. गरम कॉफीमुळे 70 वर्षांची या वृद्ध महिलेला इतका त्रास झाला की तिचं चालणं-फिरणंही बंद झाला. इतकंच नाही तर दैनंदिन कामांमध्येही तिला त्रास होऊ लागल्याचं तिच्या वकिलांनी सांगितलं.
एका कॉफीने संपूर्ण आयुष्य बदललं
या महिलेच्या वकिलाने कोर्टात केलेल्या दाव्यानुसार गरम कॉफी अंगावर पडल्याने महिला तब्बल एक आठवडा रुग्णालयात दाखल होती. एका कॉफीने तिचं संपूर्ण आयुष्य बदललं आहे. तिला चालतानाही त्रास होत असून उन्हात जाऊ शकत नाही. तसंच तिला जखमेवर सत्त मलम लावावा लागतो, असं तिच्या वकिलांनी सांगितलं.
ही महिला जॉर्जियातल्या शुगर हिल परिसरातील डंकिन आऊटलेटमध्ये गेली होती आणि तीने कॉफीची ऑर्डर दिली. पण आऊटलेटमध्ये कर्मचाऱ्याकडून चूक झाली त्याच्याकडून कॉफीचं मग तिच्या अंगावर पडला. यात महिलेच्या पोटाचा भाक भाजला गेला.
कोर्टात पोहोचलंं प्रकरण
ही जखम इतकी गंभीर होती की महिलेला रुग्णालयात (Hospitalised) दाखल करावं लागलं. यात तिला जवळपास 200,000 डॉलर म्हणजे भारतीय रुपता 1.66 कोटी रुपये खर्च आला. कर्मचाऱ्याने निष्काळजीपणा दाखवला नसता तर ही दुर्घटना झाली नसती असा युक्तीवाद त्या महिलेच्या वकिलांनी कोर्टात केला. महिलेच्या उपचाराचा खर्च आणि महिलेला झालेल्या मानिसक त्रासाचा मोबदल म्हणून डंकिन आऊटलेटकडून महिलेला 3 मिलिअन डॉलर म्हणजे जवळपास 24.95 कोटी रुपये देण्यात आले.