रोप न लावता Bungee Jumping महिलेच्या जीवावर बेतलं, पण मृत्यू चे कारण काही वेगळंच

बंजी जंपिंगची आवड असलेल्या या महिलेने 160 फूटावरुन उडी मारली. परंतु...

Updated: Jul 24, 2021, 02:26 PM IST
रोप न लावता Bungee Jumping महिलेच्या जीवावर बेतलं, पण मृत्यू चे कारण काही वेगळंच

मुंबई : आपल्यापैकी प्रत्येकाला आयुष्यात एकदातरी थरार अनुभवण्याची इच्छा असते. त्यासाठी आपण बरेच पैसे मोजतो आणि हा थरार अनुभवतो. असे थरार अनुभवताना तशी लोकांच्या सेफटीची पूर्णपणे काळजी घेतलेली असते. त्यासाठी गार्ड किंवा साखळी या सगळ्याची सोय असते. त्यामुळे लोकं त्यांच्या जिवाची चिंता करत नाहीत, कारण त्यांना माहित असते की, या सगळ्या सेफटी गार्ड त्याच्या जिवाचे रक्षण करेल. परंतु कधीकधी एकाद्याचं नशिब खराब असलं की, काहीना काही अपघात घडतो. हा अपघात कधी जिवावर बेततो, तर कधी त्यातून देखील लोकांचे जिव वाचले आहे. परंतु कोलंबियामधील येसेनिया मोरालेस गोम्जला (Yecenia Morales Gomez) हा थरारक अनुभव घेण्याचा मोह जीवावर बेतला.

बंजी जंपिंगची आवड असलेल्या या महिलेने 160 फूटावरुन उडी मारली. परंतु ती खाली पोहोचायच्या आधीच हवेत हृदयविकाराच्या झटक्याने तिचा मृत्यू झाला. खरंतर, उडी मारल्यानंतर, महिलेला समजले की, तिने बंजीची दोरी घातलेली नाही. ज्यामुळे ती घाबरली आणि तिचा हवेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला.

Yecenia सरळ जमिनीवर पडली

'द सन' मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, Yeceniaही 160 फूट उंच पुलावरून बंजी जंपींग (Bungee Jumping) करण्यासाठी गेली होती. तेथे इंस्ट्रक्टरने दिलेल्या एक सिग्नल उडी मारण्याचा सिग्नल आहे असा तिचा समज झाला. म्हणून तिने कसला ही विचार न करता तेथून उडी मारली. परंतु उडी मारल्यावर तिच्या लक्षात आले की, तिने बंजीची दोरीच घातलेली नाही.

कोणालाही समजण्याआधी Yecenia जमिनीवर पडली. तिथून तिला तत्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले.

सुरूवातीला सगळ्यांना असे वाटत होते की, Yecenia चा मृत्यू जमिनीवर पडल्यामुळे झाला आहे, परंतु वैद्यकीय अहवालात Yeceniaचे मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे स्पष्ट झाले आहे. अहवालात असे म्हटले आहे की, Yeceniaचा मृत्यू ग्राउंडवर येण्यापूर्वीच हृदयविकाराच्या झटक्याने झाला होता. Yecenia, व्यवसायाने वकील आहे. ती बन्जी जम्पिंगसाठी पहिल्यांदा तिच्या प्रियकरासह कोलंबियाच्या Antioquiaला गेली होती.

माहितीनूसार इंस्ट्रक्टरने Yeceniaच्या प्रियकराला उडी मारायचे संकेत दिले होते. परंतु Yeceniaला वाटले की, इंस्ट्रक्टरने तिलाच जंप करण्याचा सिग्नल दिला आहे, म्हणून मग तिने उडी मारली.

अपघातानंतर अग्निशमन दलाच्या मदतीने Yeceniaला बाहेर काढण्यात आले. पण तिचा मृत्यू झाला होता. या अपघातानंतर Yeceniaच्या कुटुंबाला धक्का बसला आहे.