Titanic Tourist Submersible: अब्जाधीश पुन्हा एकदा 112 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेले टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी खोल समुद्रात जाणार आहेत. जून 2023 मध्ये टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी खोल समुद्रात गेलेल्या ओशनगेट (OceanGate) कंपनीच्या टायटन पाणबुडीचा स्फोट झाला. पाणबुडीमध्ये अब्जाधीश प्रवास करत होता. टायटनच्या स्फोटानंतर नव्या पाणबुडीची निर्मीती करण्यात येत आहे. लवकरच ही पाणबुडी पुन्हा एकदा अब्जाधीशांना घेऊन खोल समुद्रात डुबकी मारणार आहे.
टायटन पाणबुडीचा स्फोट
जून 2023 मध्ये टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी निघालेल्या टायटन पाणबुडीचा स्फोट होईन ती खोल समुद्रात बुडाली. या पाणबुडीतील सर्व 5 जणांचा मृत्यू झालाय. वायूच्या दाबामुळे टायटनचा स्फोट झाला त्यामुळे सर्वांना जीव गमवावा लागलाय. 18 जून 2023 रोजी ओशनगेट कंपनीच्या या पाणबुडीचा प्रवास सुरू झाला, मात्र पहिल्या दोन तासांतच या पाणबुडीशी संपर्क तुटला. त्यानंतर या पाणबुडीचे अवशेष समुद्रात 12 हजार 500 फूट खोलवर सापडले होते. या पाणबुडीत बसलेले पाचही जण सुप्रसिद्ध अब्जाधीश होते. त्यात ओशनगेटचे सीईओ स्टॉकन रश, प्रिन्स दाऊद आणि त्यांचा मुलगा सुलेमान दाऊद, हमिश हार्डिंग आणि समुद्रशास्त्रज्ञ पॉल-हेन्री नार्गि-ओलेट यांचा समावेश होता.
टायटनच्या स्फोटानंतर अवघ्या 11 महिन्यातच टाययन सारख्याच नव्या पाणबुडीची निर्मीती करण्यात येत आहे. ही नवी पाणबुडी पुन्हा एकदा अब्जाधीशांना घेऊन टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहण्यासाठी खोल समुद्रात जाणार आहे. अमेरिकन रिअल इस्टेट अब्जाधीश लॅरी कॉनर टायटन सबमरिनर्सचे सह-संस्थापक पॅट्रिक लाहे हे या सफरीत सहभागी होणार आहेत.
ट्रायटन 4000/2 एक्सप्लोरर (Triton 4000/2 Explorer) असे या नव्या पाणबुडीचे नाव आहे. कॉनर याने या सबमर्सिबलचे डिझाइन केले आहे. या पाणबुडीची किंमत 166 कोटी रुपये इतकी आहे. ही पाणबुडी समुद्रात 4 हजार मीटर खोलीपर्यंत जाणार आहे. ही नवी कोरी ट्रायटन पाणबुडी कधी प्रवासाला निघेल याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. अमेरिकन वृत्तपत्र वॉल स्ट्रीट जर्नलला दिलेल्या मुलाखतीत लॅरी यांनी नवीन सबमरिनर्सबद्दल माहिती दिली आहे.